शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

करंजवणचे आवर्तन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 23:15 IST

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

ठळक मुद्दे३६ टक्के पाणीसाठा : स्थानिक जनतेत नाराजीचा सूर

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

करंजवण धरणात चालू वर्षी शंभर टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्यामुळे सध्या धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यातील कडळ उन्हाळ्याचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये करंजवण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. याचा परिणाम म्हणून कादवा नदीचे पात्र संपूर्णपणे कोरडे पडते. कादवा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वांरवार होत आहे.धरणातील पाणीसाठाकरंजवण - ३६ टक्केवाघाड - २४ टक्केपुणेगाव - ३५ टक्केओझरखेड - ५७ टक्केपालखेड - ६४ टक्केतिसगाव - ४८ टक्केभविष्यात स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून कादवा नदीपात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. स्थानिक जनतेला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी.- जयदीप देशमुख, करंजवण.

टॅग्स :water transportजलवाहतूकFarmerशेतकरी