करंजवणचे आवर्तन बंद करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2022 11:14 PM2022-04-09T23:14:56+5:302022-04-09T23:15:42+5:30

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Demand for closure of Karanjavan cycle | करंजवणचे आवर्तन बंद करण्याची मागणी

करंजवण डॅम.

googlenewsNext
ठळक मुद्दे३६ टक्के पाणीसाठा : स्थानिक जनतेत नाराजीचा सूर

दिंडोरी : तालुक्यातील सर्वांत मोठे व येवला, निफाड व मनमाड तालुक्यांतील शेती व शहरांना कडक उन्हाळ्यात तहान भागविणाऱ्या करंजवण धरणातून सलग एक महिन्यापासून पालखेड जलाशयामध्ये पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दिंडोरी तालुक्यातील स्थानिक जनतेकडून करंजवण धरणातून सोडलेले आवर्तन बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

करंजवण धरणात चालू वर्षी शंभर टक्के इतका पाणीसाठा होता. मात्र, सलग एक महिन्यापासून आवर्तन चालू असल्यामुळे सध्या धरणात ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. भविष्यातील कडळ उन्हाळ्याचा विचार करता तालुक्यातील जनतेला पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्यामध्ये करंजवण धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून पालखेड धरणात पाणीसाठा केला जातो. याचा परिणाम म्हणून कादवा नदीचे पात्र संपूर्णपणे कोरडे पडते. कादवा नदीकाठावरील पाणीपुरवठा योजना त्याचप्रमाणे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे करंजवण धरणातून एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी वांरवार होत आहे.

धरणातील पाणीसाठा
करंजवण - ३६ टक्के
वाघाड - २४ टक्के
पुणेगाव - ३५ टक्के
ओझरखेड - ५७ टक्के
पालखेड - ६४ टक्के
तिसगाव - ४८ टक्के

भविष्यात स्थानिक जनतेचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणातून कादवा नदीपात्रात एक महिन्याच्या अंतराने पाणी सोडण्यात आले पाहिजे. स्थानिक जनतेला पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही याची दखल पालकमंत्री छगन भुजबळ व महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांनी घ्यावी.
- जयदीप देशमुख, करंजवण.

Web Title: Demand for closure of Karanjavan cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.