ओझर : पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.युवा सेनेचे तालुकाप्रमुख आशिष शिंदे यांच्यासह गावातील पदाधिकाऱ्यांनी महामार्ग प्रकल्प अभियंता सागर देशमुख यांना निवेदन दिले. ओझर येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व वाहतूक सर्व्हिस रोडवरून सुरू आहे. अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. दुचाकी तसेच छोट्या वाहनधारकांना या खड्ड्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. सर्व्हिस रोडचे नव्याने मजबुतीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश महाले, कामेश शिंदे, प्रशांत पगार, गुणेंद्र तांबट, विशाल मालसाने, पिंटू शिंदे आदी उपस्थित होते.ओझरजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने सर्व्हिस रोडने वाहतूक सुरू आहे. काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत. गावकºयांसाठी ही बाब अतिशय धोक्याची आहे. त्यामुळे अनेक बळी गेले आहेत. तीन दिवसात खड्डे न बुजवल्यास भरमसाठ टोल वसुली करणाºया टोल नाक्यावर आंदोलन करून तो बंद पाडण्यात येईल.- आशिष बाळासाहेब शिंदे, तालुकाप्रमुख,युवा सेना, निफाड
ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:12 IST
ओझर : पावसाळ्यात परिसरातील सर्व्हिस रोडवर निर्माण होणाऱ्या खड्ड्यांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. खड्डे न बुजवल्यास टोल नाका बंद करण्याचा इशारा युवा सेनेने निवेदनाद्वारे दिला आहे.
ओझर येथील खड्डे बुजविण्याची मागणी
ठळक मुद्देअवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ता उखडून गेला