शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड फाट्यावर सर्कलची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 00:47 IST

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरातून जाणाऱ्या शिर्डी- सुरत महामार्गाचे गेल्या दोन तीन वर्षांपासून कासव गतिने काम सुरू असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सदर काम जलद गतीने पूर्ण करून त्या ठिकाणी सर्कल उभारावे, अशी मागणी आदिवासी उलगुलान सेनेने बांधकाम विभाग नाशिकचे अभियंता पाटील, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे व ग्रामपंचायतचे गणेश बनकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देअपघातात वाढ : आदिवासी उलगुलान सेनेचे निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी उलगुलान सेनेतर्फे अपघाताचे गांभीर्य लक्षात आणून देत मुखेड फाट्यावर सर्कल बांधून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी ठेकेदार व संबंधित विभागाला केली; मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने अपघात होऊन निष्पाप लोकांचे बळी जात आहेत. लवकरात लवकर सदर काम पूर्ण करून दिलासा द्यावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा आदिवासी उलगुलान सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर फसाळे यांनी दिला आहे. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रेय झनकर, भागवत घागरे, ग्रामपंचायत माजी सदस्य विष्णू गांगुर्डे, शाखा अध्यक्ष रमेश गवळी, संदीप जाधव, भाऊसाहेब पिठे, जितू वाघ, मनोज पवार, श्याम कोकाटे, मनोज कराटे, आकाश मोरे आदी उपस्थित होते.बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायत यांना वारंवार निवेदन देऊनही अद्यापही मुखेड फाट्यावरील सर्कलविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तेथील वस्तीच्या ठिकाणच्या रस्त्याचे कामदेखील अपूर्ण आहे. ते लवकरात लवकर पूर्ण करावे.- प्रभाकर फसाळे, संस्थापक, आदिवासी उलगुलान सेना

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात