तालुक्यातील रस्त्याची झालेली दुरवस्था, ठिकठिकाणी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे व अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असल्याने, तालुक्यातील काही मार्गावरील बससेवा बंद करण्यात आली असून काही बसेस अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. तसेच नऊ महिन्यापासून जगभरात सुरू असलेल्या कोविड-१९ च्या संसर्गामुळे संपूर्ण देश व राज्यात बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र सध्या कोविडच्या विळख्यातून देशातील परिस्थिती सुधारत असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शासनाने आठवडी बाजार, शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये चालू केली, मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी, प्रवासी यांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध नसल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यातील खराब रस्ते एसटी वाहतुकीसाठी काही प्रमाणात सुयोग्य झाले असून, या मार्गावरील बंद असलेली बससेवा सुरू करून तालुक्यातील ग्रामीण जनतेला दिलासा द्यावा, या आशयाचे निवेदन आदिवासी बचाव अभियानचे कार्यकर्ते मनोहर गायकवाड, सुशील कुंवर, कौतिक कुंवर, योगेश बागुल आदूंनी कळवण आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांना दिले.
कळवण तालुक्यात बससेवा पूर्ववत करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 17:50 IST
कळवण : तालुक्यातील आदिवासीबहुल भागात अनेक वर्षांपासून बंद असलेली बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानच्या कार्यकर्त्यांनी कळवण आगारप्रमुखांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कळवण तालुक्यात बससेवा पूर्ववत करण्याची मागणी
ठळक मुद्दे आदिवासी बचाव अभियानचे निवेदन