शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकावर बंदीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 15:37 IST

‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या  पुस्तकातील  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडताना दिसत आहे. नाशिकमधील मराठा संघटनांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन भारपा व केंद्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. 

ठळक मुद्देछावा क्रांतीवीर सेनेची आक्रामक भूमिका‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ पुस्तकावर बंदीची मागणी

नाशिक : भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात ‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या  पुस्तकातील  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडताना दिसत आहे. नाशिकमधील मराठा संघटनांनी या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात छावा क्रांतिवीर सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन भारपा व केंद्र सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रयतेच राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणाºया पुस्तकाचे प्रकाशन करून  काय साध्य करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु असा सवाल उपस्थित करतानाच भाजपाचे दिल्लीचे अध्यक्ष मनोज तिवारींसह भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत जय भगवान गोयल यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आल्याने शिव भक्तांमध्ये तीव्र रोष असून अशाप्रकारे वाद निर्माण क रणाºया घटकांना वेळेत लगाम घातला नाही तर त्यांचा संघटनेच्या माध्यमातून समाचार घेण्याचा इशारा छावा क्रांतीवर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी या निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय  युगपुरुष आहेत. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत नससल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे आचार ,विचार आत्मसात करण्याचे आवाहन करतानाच स्वत:च पुस्तक छापून प्रतिमेच्या शेजारी प्रतिमा छापली म्हणजे कोणही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करू पाहत  असेल अशा नमोरुग्णांना वेळीच आवर घालण्यात यावा अन्यथा अन्यथा छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रा.उमेश शिंदे, विजय खर्जुल, राजू देसले, संतोष माळोदे , नितीन सातपुते ,निलेश मोरे ,सागर पवार ,वैभव दळवी ,अर्जुन शिरसाठ ,सुभाष गायकर ,मनोरमा पाटील ,अयाज काजी,नाशीर पटेल ,नरेंद्र भगडे ,इस्माईल शेख,गणेश पवार ,गणेश ढिकले ,दीपक जगताप ,गणेश काजळे ,भरत निसाळ ,सुरेश पाटील ,गणेश गायकवाड ,अनिल गुंजाळ ,अनिल मेघाल, आदी उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यNashikनाशिकBJPभाजपाcollectorजिल्हाधिकारी