पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आदिवासी रु ग्णांच्या सेवेसाठी असलेल्या १०८ रूग्णवाहिकेतून गंभीर आजारी रु ग्णांना नाशिक येथे नेण्यात येत होते. सदर वाहनाला अडवून नाशिकच्या दोन महिलांनी चालकाला व रूग्णाच्या नातेवाईकांना शिवीगाळ करीत मारहाण केली. रूग्णाच्या नातेवाईकांनी विनंती करूनही त्या महिलांचा धिंगाणा सुरूच होता. आदिवासी समाजातील जनतेला अपशब्द वापरून मारहाण करणा-या या दोन्ही महिलांना तत्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शामराव गावित ,किरण भुसारे ,मोहन कामडी, कुमार मोंढे, पुष्कर गांगोडे, गणेश गावित, सुरेश पवार, नामदेव वाघेरे, ललित शिंगाडे, किरण वार्डे आदींच्या सह्या आहेत.
शासकीय रु ग्णवाहिकेवर हल्ला करणाऱ्या ‘त्या’ महिलांना अटक करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 17:02 IST