शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
3
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
4
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
5
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
6
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
7
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
8
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
9
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
10
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
11
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
12
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
13
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
14
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
15
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
16
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
17
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
18
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
19
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
20
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

उशिरापर्यंत चालणाऱ्या मद्य दुकानांवर कारवाईची मागणी

By admin | Updated: July 30, 2014 00:18 IST

उशिरापर्यंत चालणाऱ्या मद्य दुकानांवर कारवाईची मागणी

नाशिकरोड : शहरात मध्यरात्री उशिरापर्यंत देशी-विदेशी दारू दुकाने व बिअर बार खुले राहत असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.भारिप-बहुजन महासंघ यांच्या वतीने नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहर परिसरात मध्यरात्री उशिरापर्यंत अनधिकृतपणे देशी-विदेशी दारू दुकान व बिअर बार खुले राहतात. यामुळे वाद-विवाद, मारामाऱ्या व अनुचित घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम बिअर बार आदि ठिकाणी रात्री उशिरापर्यंत आपला वेळ घालवतात. त्यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा घटना घडवितात. त्यामुळे अनधिकृतपणे रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या दारू दुकान व बिअर बारवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर शहराध्यक्ष विश्वनाथ भालेराव, कार्याध्यक्ष भिमचंद्र चंद्रमोरे, सुरेश पारखे, बाळासाहेब घायवटे, संजय वाघमारे, आशिष थोरात, जहांगिर शेख, दीपक भालेराव, अशोक सोनकांबळे, पप्पू घोडके आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे यांना निवेदन देतांना मनोहर रुपवते, अ‍ॅड. राजेंद्र चंद्रमोरे, निखिल सोनवणे, भिका गांगुर्डे, संदीप चंद्रमोरे, दीपक जाधव, निंबा खरात, अमोल भालेराव, भागवत शिरसाठ, पप्पू घोडके आदि.