शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी मारहाण प्रकरणी कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 17:35 IST

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून नाव लौकीक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांस येथील आडतदाराकडून मारहाण झाली त्या अडती वर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन देऊन केली आहे .

ठळक मुद्देशेतकऱ्यांसह, सामाजिक कार्यकर्त्यांचे बाजार समितीला निवेदन

पिंपळगाव बसवंत : नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारसमिती म्हणून नाव लौकीक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये शुक्रवारी (दि. २३) टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांस येथील आडतदाराकडून मारहाण झाली त्या अडती वर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी बाजार समितीचे सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन देऊन केली आहे .त्यावर दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन सचिव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव हे गेल्यावर संत सावता माळी आडतमधील दोघांनी त्यांना मारहाण केली. त्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून सोमवारी (दि.२६) उंबरखेडचे माजी सरपंच भाऊ घुमरे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे, प्रकाश वाटपाडे, बेहेडचे माजी सरपंच अशोक घुटे, दावचवाडीचे माजी सरपंच योगेश कुयटे, पीडित शेतकरी जितेंद्र जाधव आदीसह शेतकऱ्यांनी बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांना निवेदन दिले.या मारहाण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली. दरम्यान, या प्रकरणी मंगळवारी (दि. २७) सभापती दिलीप बनकर यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे बाजारे यांनी सांगितले.दरम्यान, बाजार समिती परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांकडे अशोक घुटे यांनी लक्ष वेधले. त्यावर असे प्रकार आढळल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, असे बाजारे यांनी सांगितले.शेतकरी दारू पिला नसल्याचा खुलासामारहाण झालेल्या शेतकर्याने मद्यपान केले असल्याचा आरोप आडत मालकाने केला होता. मात्र, संबंधित शेतकऱ्याने मद्यपान केले नसल्याचा खुलासा बाजार समिती कर्मचारी दीपक गवळी यांनी केला.कारवाई होणारच...!कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र बाळासाहेब जाधव यांना झालेली मारहाण निषेधार्ह आहे. त्यामुळे संबंधितांवरकारवाई होणार असल्याचे बाजार समिती सचिव बाळासाहेब बाजारे यांनी सांगितले.टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यास मारहाण करणाऱ्यांवर बाजार समितीने कारवाई करावी. तसे न झाल्यास आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल.- प्रकाश वाटपाडे, सामाजिक कार्यकर्ते, पाचोरे वणीशुक्रवारी टोमॅटो मालाचे पैसे घेण्यासाठी गेल्यानंतर मला आडतदारांकडून मारहाण करण्यात आली. मात्र, तीन दिवस उलटूनही अद्याप त्या आडतदाराने पैसे दिलेले नाहीत. उलट माझी बदनामी करण्याचे षडयंत्र त्यांनी सुरू केले आहे- जितेंद्र जाधव, पीडित शेतकरी, कारसूळ.(फोटो २६ पिंपळगाव १)मारहाण करणार्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सचिव बाळासाहेब बाजारे यांना देताना भाऊ घुमरे, देवेंद्र काजळे, योगेश कुयटे, अशोक घुटे, प्रकाश वाटपाडे, जितेंद्र जाधव आदी.

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारी