शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मीटररीडिंगप्रमाणेच अचूक वीजदेयके देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:16 IST

सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी विद्युत अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देवाढीव आकारणी केल्याने तीव्र नाराजीआर्थिक भुर्दंड

सिडको : महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सदोष तसेच वाढीव रकमेची देयके (बिल) आकारल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे अचूक आकारणी करून मीटररीडिंगप्रमाणेच वीजदेयके देण्यात यावी. तसेच वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ मागे घेण्यात यावी, अशी मागणी ग्राहकांनी विद्युत अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कोरोना विषाणूच्या संकटामुळे नोकरी, व्यवसाय अडचणीत आले असताना महावितरण कंपनीने तीन महिन्यांच्या लॉकडाऊनदरम्यान अव्वाच्या सव्वा रकमेची बिले पाठविल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे वीज नियामक आयोगाच्या दि. ३० मार्च २०२० च्या आदेशान्वये वीजदरात मोठी वाढ करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ ग्राहकांच्या लक्षातच आली नाही. दुसरी बाब लॉकडाऊनच्या काळात मीटररीडिंग घेण्यात आले नाही. आता लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने मीटररीडिंग घेण्यात आले. तेव्हा तीन महिन्यांच्या कालावधीचा वापर एकत्र नोंदला गेला. महापालिका क्षेत्रातील वीजग्राहकांना बिलांमध्ये प्रत्येकी दहा रु पये कोविड-१९ अधिभार लावण्यात आला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून अनेकांचे रोजगार बंद आहेत, तर काहींचे बुडाले आहेत. अशा परिस्थितीत दैनंदिन गरजा भागविताना नागरिकांची दमछाक होत आहे. त्यातच महावितरणकडून वाढीव वीजदेयके आकारल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम असून, याबाबतीत महावितरणकडून सदोष वीजबिल आकारणीमुळे प्रशासनाविरोधात असंतोष पसरला आहे. महावितरणकडून ग्राहकांना अचूक वीजदेयके मीटररीडिंगनुसारच आकारण्यात यावी, महावितरणकडून सदोष आकारलेली बिले कमी करण्यात यावी, त्याचप्रमाणे वीज नियामक आयोगाने सुचवलेली दरवाढ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागे घेण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरु पाचे आंदोलन केले जाईल, अशा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. आमदार सीमा हिरे यांनी महावितरण अधीक्षक अभियंता यांना निवेदन दिले. यावेळी नगरसेवक छाया देवांग, मनीषा देवरे, मंडल अध्यक्ष शिवाजी बरके, अविनाश पाटील, अमोल इघे, राजेंद्र चिखले, राकेश ढोमसे, प्रकाश चकोर, हेमंत नेहते, परमानंद पाटील, तेजस निरभवणे, सुशील नाईक आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज