शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
3
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
4
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
5
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
6
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
7
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
8
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
9
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
10
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
11
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
12
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
13
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
14
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
15
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
16
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
17
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
18
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
19
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
20
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा

बनावट नोटांद्वारे अर्थव्यवस्था खिळखिळी करणाऱ्या दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:36 IST

 नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाºया दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, सातपूर) व जावेद अब्दुल कादीर मनियार (४४, रा़ हरीष रेसिडेन्सी, साईनाथनगर) अशी शिक्षा ...

ठळक मुद्देबनावट नोटांप्रकरणी गंभीर शिक्षा होण्याचा राज्यातील हा पहिलाच निकाल शंभर रुपयांची नोट पन्नासला

 

नाशिक : बनावट नोटा तयार करून देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणाºया दोघांना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी शनिवारी (दि़ ७) जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ज्ञानेश्वर सीताराम पाटील (३७, भोर टाउनशिप अंबड-लिंक रोड, सातपूर) व जावेद अब्दुल कादीर मनियार (४४, रा़ हरीष रेसिडेन्सी, साईनाथनगर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत़ दरम्यान, अर्थव्यवस्थेला धक्का देणाºया बनावट नोटांप्रकरणी गंभीर शिक्षा होण्याचा राज्यातील हा पहिलाच निकाल असल्याची माहिती न्यायालयीन सूत्रांनी दिली आहे़इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील साती आसरा मंदिराजवळ १०० रुपये दराच्या चार लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करून विक्रीसाठी आलेले आरोपी पाटील व मनियार या दोघांना शहर गुन्हे शाखेने १० आॅक्टोबर २०१४ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास बनावट गिºहाईक पाठवून अटक केली होती़ त्यांच्याविरोधात पोलीस हवालदार जाकीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ या गुन्ह्णातील तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व पथकाने बनावट नोटा तयार करीत असलेल्या ठिकाणी छापा टाकून कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, हार्डडिस्क, नोटा तयार करण्यासाठी लागणारा पेपर, कटर मशीन यासह वीस हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केल्या होत्या़न्यायाधीश शिंदे यांच्या न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्यात सरकारी वकील शिरीष कडवे व विद्या जाधव यांनी अकरा साक्षीदार तपासले़ त्यामध्ये कलीना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेने दिलेला तपासणी अहवाल, नाशिकरोडच्या करन्सी नोट प्रेसचे उपव्यवस्थापक शेखरकुमार घोष यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली़ न्यायाधीश शिंदे यांनी या आपल्या ५५ पानी निकालात या दोघांनाही भारतीय दंडविधान कलम ४८९ (अ,ब,क,ड,ई) अन्वये दोषी ठरवून जन्मठेप तसेच पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली़ इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी एल़यू़ शेख, पोलीस नाईक संतोष गोसावी, कोर्ट कर्मचारी एस़बी़ गोडसे यांनी पाठपुरावा केला़शंभर रुपयांची नोट पन्नासलाइंदिरानगरच्या सातीआसरा मंदिराजवळ आरोपी पाटील व मनियार यांनी १०० रुपयांच्या बनावट नोटांचे ४२ बंडल (४ लाख २० हजार रुपये) हे विक्रीसाठी आणले होते़ शंभर रुपयांची बनावट नोट पन्नास रुपयांना विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बनावट गिºहाईक पाठवून या दोघांना सापळा लावून पकडले होते़आर्थिक गुन्ह्णांमध्ये कठोर शिक्षेचे आदेशआर्थिक गुन्ह्णांसंबंधी कठोर शिक्षा देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत़ बनावट नोटांमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी होत असून, आरोपींकडे शंभर रुपये दराच्या चार लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा तसेच नोटा तयार करीत असलेल्या ठिकाणी वीस हजार असे चार लाख चाळीस हजार रुपये पोलिसांनी जप्त केले़ कलीना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचा नोटा तपासणी अहवाल, पंचांच्या साक्षीवरून आरोपी अनेक दिवसांपासून बनावट नोटा तयार करीत असल्याचे सिद्ध झाले़ अर्थव्यवस्थेला धोका पोहोचविणाºया अशा आरोपींना दया दाखविल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे त्यांना कठोर शिक्षाच योग्य आहे़- सूर्यकांत शिंदे, प्रधान जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक़