शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्री होल्ड’ निर्णयाच्या अंमलबजावणीस विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:46 IST

सिडको : सिडको प्रशासनाने ९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत वीस दिवसांहून अधिक दिवस उलटले असताना नाशिक येथील सिडकोच्या कार्यालयात वरिष्ठांकडून कोणतेही लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे प्रशासकांकडून सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देसिडको प्रशासन : अजूनही नागरिकांना शुल्क भरण्याची सक्ती

सिडको : सिडको प्रशासनाने ९९ वर्षांच्या कराराने नागरिकांना दिलेली घरे ‘फ्री होल्ड’ अर्थातच कायमस्वरूपी घरमालकाच्या नावे करण्याच्या निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत वीस दिवसांहून अधिक दिवस उलटले असताना नाशिक येथील सिडकोच्या कार्यालयात वरिष्ठांकडून कोणतेही लेखी आदेश अद्याप प्राप्त झाले नसल्याचे प्रशासकांकडून सांगण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या कामकाजासाठी सिडकोकडे जावे लागत असून, त्यांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.सिडको प्रशासनाने सुमारे ४० वर्षांपूर्वी जुने व नवीन सिडको भागातील सुमारे १६५ शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून त्या जागेवर टप्प्याटप्प्याने सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा पद्धतीने एक ते सहा योजनांची निर्मिती केली. यात सिडकोने सुमारे पंचवीस हजार घरे बांधून ती नागरिकांना हप्तेबंद पद्धतीने ९९ वर्षांच्या कराराने लीज (भाडेतत्त्वावर) दिली होती. सिडकोने टप्प्याटप्प्याने सहाही योजना महापालिकेकडे हस्तांतरित केल्या. परंतु सर्व योजना मनपाकडे हस्तांतरित केलेल्या असतानाही घर बांधणे, ना-हरकत दाखला देण्याचे काम हे सिडकोकडेच ठेवण्यात आले होते. सिडकोने सर्व योजना मनपाकडे हस्तांतरित केल्याने इतर अधिकारही मनपाकडे वर्ग करावे तसेच सिडकोतील सर्व घरे ही ‘फ्री होल्ड’ करावी, याबाबत सर्व राजकीय पक्ष व संघटनांनी आंदोलने केली होती. तसेच त्याबाबत तत्कालीन लोकप्रतिनिधींनीही शासन दरबारी पाठपुरावा केला होता. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसमवेत सिडकोच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. यात सिडको भागातील नागरिकांची सर्व घरे ‘फ्री होल्ड’ करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत अधिकाºयांना दिले होते. यास वीस दिवसांहून अधिक कालावधी उलटून गेला असला तरी अद्यापही नाशिक सिडकोच्या कार्यालयात याबाबतचे कोणतेही आदेश प्राप्त झाले नसल्याचे प्रशासक अनिल झोपे यांनी सांगितले. यामुळे आजही नागरिकांना घर हस्तांतरण शुल्क, घर बांधणी, वारसा हक्क आदी कामांसाठी नागरिकांना सिडकोकडे जावे लागत असल्याने ‘फ्री होल्ड’ झाले असतानाही आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकcidcoसिडको