शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

अग्नी आखाड्याचे श्रीमहंत गोपालानंद यांचे देहावसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 16:23 IST

११७ व्या अखेरचा श्वास : त्र्यंबकेश्वर येथे आखाड्यांकडून श्रद्धांजली

ठळक मुद्देअग्नी आखाड्याची इष्ट देवता वेदमाता गायत्री मातेचे देखील सुंदर मंदिर उभारण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. 

त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभमेळ्यात अखाडा परिषदेच्या निर्णयात महत्वाची भुमिका निभावणारे श्री अग्नी आखाड्याचे सभापती श्रीमहंत गोपालानंद ब्रम्हचारी यांनी वयाच्या ११७ व्या वर्षी जुनागढ, बिलखा येथे अखेरचा श्वास घेतला. त्र्यंबकेश्वर येथील दहाही आखाड्यांच्यावतीने श्रीमहंत गोपालानंद ब्रह्मचारी यांना आदरांजली वाहण्यात आली.श्रीमहंत गोपालानंद गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्र्यंबकेश्वर मधील दहाही आखाड्यांच्या महंतांनी त्यांच्या प्रकृतीस आराम पडावा म्हणून भगवान त्र्यंबकराज, उज्जैनचे भगवान महाकालेश्वर याठिकाणी महामृत्युंजय जाप करु न प्रार्थना केली होती. श्रीपंचायती जुना आखाड्यासमवेत त्यांची सिंहस्थ शाहीस्नान करण्याची परंपरा आहे, त्या आखाड्याचे संरक्षक महंत तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरीजी महाराज हे जुनागढ बिलखा येथे त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत होते. श्रीमहंत ब्रह्मलीन झाल्याची वार्ता येताच त्र्यंबकेश्वर येथील दहाही आखाड्यांच्या साधुमहंतांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वती यांच्या उपस्थितीत त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आनंद आखाड्याचे महंत शंकरानंद सरस्वती, अटल आखाड्याचे महंत उदयगरी महाराज, जुना आखाड्याचे महंत विष्णु गिरी, अरु ण भारती, सुखदेव गिरी, आनंद आखाड्याचे महंत धनराजगिरी महाराज, महानिर्वाणी आखाड्याचे महंत शिवनारायण पुरी, उदासिन नयाचे महंत विचारदास महाराज तसेच आवाहन उदासिन बडा आदी आखाड्याचे महंत उपस्थित होते.स्मृतींना दिला उजाळासिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी त्र्यंबकेश्वर येथील श्रीपंचायती अग्नी आखाड्याची इमारत मोडकळीस आली होती. या पाशवभूमीवर सभापती महंत गोपालानंद ब्रम्हचारी व सचिव महंत गोविंदानंद ब्रम्हचारी यांनी नवीन इमारतीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला आणि अवघ्या दोन-तीन महिन्यात नवीन व आकर्षक अशा सुंदर इमारती बांधण्यात आल्या. याबरोबरच अग्नी आखाड्याची इष्ट देवता वेदमाता गायत्री मातेचे देखील सुंदर मंदिर उभारण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. 

टॅग्स :NashikनाशिकDeathमृत्यू