नाशिकमध्ये आता डिफेन्स पार्क होणार; राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस

By संजय पाठक | Published: November 29, 2023 04:12 PM2023-11-29T16:12:05+5:302023-11-29T16:20:32+5:30

​​​​​​​नाशिक शहर जवळपास सर्वच प्रकारच्या उद्योगांसाठी अनुकल आहे

Defense Park will now be built in Nashik Recommendation from the State Government to the Centre | नाशिकमध्ये आता डिफेन्स पार्क होणार; राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस

नाशिकमध्ये आता डिफेन्स पार्क होणार; राज्य शासनाकडून केंद्राला शिफारस

संजय पाठक, नाशिक: गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकला मेाठे उद्योग यावेत अशी अपेक्षा आहे. मध्यंतरी ओझरला एअरबस दुरस्तीचा प्रकल्प होण्यावर शिक्कामोर्तब झाले. त्या पाठोपाठ आता नाशिकमध्ये डिफेन्स पार्क देखील होणार आहे. यासंदर्भात राज्य शासनाने केंद्र शासनाने नाशिकला डिफेन्स पार्क उभारण्याची शिफारस केली आहे.

नाशिक शहर जवळपास सर्वच प्रकारच्या उद्योगांसाठी अनुकल आहे. दळणवळणाची साधने वाढली असून मुंबई पुण्याच्या सुवर्ण त्रिकोणातील हे शहर आहे. शहर आणि परिसरात स्कूल ऑफ आर्टिलरी, एअर फोर्स स्टेशन आणि इतर सुरक्षा संबंधित केंद्रीय आणि राज्यसंस्था आहेत.नासिक हे आधीच संरक्षण संबंधित उपक्रमांचे केंद्र आहे.यामुळे नाशिक येथेच डिफेन्स पार्क उभारण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे शिफारस करावी, यासाठी खा. हेमंत गोडसे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना दोन वर्षांपूर्वी पत्र दिले होते. त्यानुसार  नाशिकला  ठिकाणी डिफेन्स पार्क उभारण्यात यावे यासाठीची शिफारस बुधवारी (दि.२९) राज्य शासनाने केंद्रिय वाणिज्य, उद्योग मंत्री, ना.पियुष गोयल आणि संरक्षणमंत्री ना.राजनाथ सिंग यांच्याकडे केली आहे.

डिफेन्स पार्क उभारण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे शिफारस केल्याने पार्क उभारणीच्या प्रस्तावाचा पहिला आणि महत्वपूर्ण टप्पा पार केल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे.

Web Title: Defense Park will now be built in Nashik Recommendation from the State Government to the Centre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक