नाशिक : पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला बुधवारी (दि.२) पूर्णविराम मिळाला. नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांची नियुक्ती करण्यात आली.गणेशोत्सव पार पडताच गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) राज्यातील विविध ४५ अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश काढले. जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांची पाण्डेय यांच्या रिक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर दोर्जे यांचा कारभार बागलाण तालुक्याचे भूमीपूत्र प्रताप दिघावकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशिरा गृह खात्याकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारीत केले गेले. दरम्यान, सकाळपासूनच समाजमाध्यमांमध्ये याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली होती. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची अमरावती शहराच्या पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्तपदी अद्याप कोणत्याही आयपीएस अधिकाºयांचे नाव शासनाकडून निश्चित केले गेले नाही.
पोलीस आयुक्तपदी दीपक पाण्डेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 02:18 IST
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला बुधवारी (दि.२) पूर्णविराम मिळाला. नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा-सुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या रिक्त पदावर मुंबईचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पाण्डेय यांची नियुक्ती करण्यात आली.
पोलीस आयुक्तपदी दीपक पाण्डेय
ठळक मुद्देविशेष पोलीस महानिरीक्षकपदी दिघावकर : दोर्जे, नांगरे पाटील, आरती सिंह यांची बदली