शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिडको सभापतिपदी दीपक दातीर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:17 IST

नाशिक महानगरपालिका सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

सिडको : नाशिक महानगरपालिका सिडको प्रभाग सभापतिपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी निवडणूक प्रक्रियेत प्रभाग सभापतिपदासाठी शिवसेनेच्या वतीने दीपक दातीर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे दातीर यांची सिडको प्रभाग सभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केली.प्रभाग समिती सभापतिपदासाठी शिवसेनेकडून दीपक दातीर, श्यामकुमार साबळे ही दोन नावे चर्चेत होती. मात्र साबळे यांनी अर्जच दाखल न केल्याने सभापतिपदासाठी दातीर यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला होता. माघारीची निर्धारित वेळ समाप्त होताच निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी दीपक दातीर यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करताच सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केले. मावळत्या सभापती हर्षा बडगुजर यांनी सभापतिपदाची सूत्रे नवनिर्वाचित सभापती दातीर यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, सुधाकर बडगुजर, हर्षा बडगुजर, अजय बोरस्ते, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, कल्पना चुंभळे, किरण दराडे, चंद्रकांत खाडे, रत्नमाला राणे, सुदाम डेमसे, संगीता जाधव यांच्यासह भाजपाचे भाग्यश्री ढोमसे, राकेश दोंदे, नीलेश ठाकरे, छाया देवांग, भगवान दोंदे, पुष्पा आव्हाड आदी नगरसेवकांसह नगरसचिव आर. आर. गोसावी, विभागीय अधिकारी वाडेकर उपस्थित होते. दीपक दातीर यांंची निवड झाल्यावर त्याचे महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते सभागृहनेते बापू सतीश सोनवणे, विलास शिंदे, जगदीश पाटील, महेश बडवे, दिलीप दातीर, सुभाष गायधनी, बाळा दराडे आदींनी स्वागत केले.शिवसेनेचेच वर्चस्वसिडको प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व असून, २४ पैकी १४ सदस्य शिवसेनेचे असल्याने सभापतिपद शिवसेनेकडेच रहाणार असल्याचे स्पष्ट होते. सभागृहात भाजपाची सदस्य संख्या नऊ असून, राष्ट्रवादी काँगेसचा एक सदस्य आहे. त्यामुळे पाचही वर्षी शिवसेनेचाच सभापती रहाणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना