शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:14 IST

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत.

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील भवानी पाझर तलाव पूर्णपणे आटल्याने ऐन उन्हाळ्यात एप्रिल महिन्यातच तीव्र पाणीटंचाईचा सामना गडावरील नागरिकांना करावा लागत असून, टँकरच्या पाण्यावर ग्रामस्थांसह भाविकांना अवलंबून राहावे लागत असल्याने दरवर्षीप्रमाणेच यंदाही पाणीटंचाईच्या झळा सप्तशृंगगडवासीयांना सोसाव्या लागत आहेत. सप्तशृंगगडावर भवानी पाझर तलावातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्याची चाहूल लागताच सप्तशृंगगडावर पाणीटंचाईची समस्या दरवर्षी नित्याचीच झाली आहे. भवानी पाझर तलावाव्यतिरिक्त पाण्याची दुसरी कुठलीही व्यवस्था नसल्याने टँकरच्या पाण्याशिवाय दुसरा पर्यायच सप्तशृंगगडावरील नागरिकांना उपलब्ध नाही. ऐन उन्हाळ्यात गरजेच्या वेळीपाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतो. यंदा एप्रिलच्या मध्यातच भवानी पाझर तलावाचे काम सुरू असल्याने तलाव कोरडाठाक झाला असून, त्यामुळे गडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम यंदा हाती घेण्यात आले असून, गळती रोखण्यासोबतच तलावातील गाळही काढला जात असल्याने पुढच्या वर्षीपासून सप्तशृंगगडावर पाणीटंचाईचे चटके सोसावे लागणार नाहीत अशी अपेक्षा गडावरील नागरिक बाळगून आहेत. मात्र सध्याची भयाण परिस्थिती बघता पुढील दोन महिने पाण्याची स्थिती गंभीर राहणार असून, सप्तशृंगगडावरील पाणीटंचाईच्या दृष्टीने शासनाने तत्काळ दखल घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे. सध्या मात्र ग्रामस्थांना पाण्यासाठी टँकरचाच आधार घ्यावा लागत आहे.टॅँकरने पाणीपुरवठासप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सुरू असल्याने पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे सप्तशृंगगडावर तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. टॅँकरने पाणीपुरवठा करून सप्तशृंगगड ग्रामपंचायत सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या मदतीने देवीभक्तांची तहान भागवत आहे. सप्तशृंगगड ग्रामपंचायतीला पाणीपुरवठा करणाºया भवानी पाझर तलावाच्या दुरु स्तीचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा बंद आहे. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ग्रामस्थ गंगा, जमुना, पंजाबी कुंडावरून पायपीट करून पाणी आणतात. गावातील तीन हातपंप, गावातील खासगी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. चैत्रोत्सव काळात ग्रामस्थ व भाविकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये म्हणून सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या टँकरने सप्तशृंगगडावर पाणीपुरवठा करण्यात आला होता व आजही चालू आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई