Deep water scarcity in Pelakos village | पिळकोस गावात तीव्र पाणी टंचाई
गावातील महिला दूरवर जाऊन डोक्यावर पाणी घेऊन येताना.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : महिला करतात पाण्यासाठी पायपीट; गावात स्वखर्चाने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा

पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस या गावात जलस्वराज्य प्रकल्प योजना राबली असून देखील, फक्त गिरणा नदीला आवर्तन आल्यावरच पिळकोस वासियांना ग्रामपंचायती मार्फत मुबलक पाणीपुरवठा होतो व नदीला आलेले आवर्तन बंद झाल्यावर पिळकोस गावातील महिलांना पुन्हा नेहमी प्रमाणे पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे .पिळकोस हि ग्रामपंचायत हि तीस वर्षापासून गावातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यास असमर्थ ठरली असून आजवरच्या सर्व सरपंच व ग्रामसेवक यांनी फक्त शासनाचा निधी मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी वारला असून वापरला गेलेल्या निधीच्या एकपट हि नागरिकांना पाणीपुरवठा होत नसून आज महिलांना एक ते दोन किलोमीटर लांबून डोक्यावर पाणी
तब्बल एक महिनाभरापासून महिलांना गावापासून दूरवर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिण्यासाठी व वापरासाठी डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. मात्र एवढी भीषण परिस्थिती असतानाही पिळकोस ग्रामपंचायतिने गावाला आजवरच्या इतिहासात एकदाही ट्यानकरने गावाला पाणीपुरवठा केलेला नसून ग्रामपंचायत याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून असल्याने गावातील महिलावर्गाकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबातील वरिष्ठांनी लक्ष घालावे व हे पाणी कुठे मुरले असून याची शहानिशा करून ग्रामपंचायतिच्या विहिरीचे आजवरची झालेली कामे व विहरीची आजची असली एकनदरीत असलेली खोली याची पडताळणी केली असता हे पाणी कुठे मुरले हे स्पठ होईल व ग्रामपंचायतीने आजवर पाण्यासाठी केलेला शासनाचा निधी पूर्णपणे पाण्यात गेला असून अश्या दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी संपूर्ण गावकरी व महिलावर्गाकडून होत आहे.
पिळकोस गाव हे गिरणा काठ लगतचे गाव पाण्याच्या बाबतीत सर्व उपलब्धता असतानादेखील फक्त ग्रामपंचायतिचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभार व आजवर पाण्याच्या बाबतीत ग्रामपंचायतिच्या विहरीची थातूर ङ्क्तमातुर झालेल्या कामांमुळे आज गावाच्या चारही बाजूंच्या विहिरी ह्या एवढ्या दुष्काळात पाण्याची गरज भागवत असून व शेतकर्यांच्या वियक्तक विहरी ह्या एक ते दोन तास चालू आहेत व ग्रामपंचायतीची विहीर हि गावाला पाणीपुरवठा करू शकत नाही. हि बाब शेतकर्यांना ग्रामस्थांना मान्य नसून आज गावात राहणार्या ग्रामस्थांना व महिलांना ग्रामपंचायतिच्या चुकीच्या धोरणांमुळे पाण्यासाठी दिवसभर पायपीट करावी लागत आहे.
पिळकोस गावाला पाणीपुरवठा करणारी विहिरी हि ३० वर्षापासून तिच असून आजवर १५ ते २० वेळा तिचे खोदकाम झालेले आहे व जलस्वराज्य योजनेंतर्गत तिचे बांधकाम खोदकाम हि झालेले असताना हि विहीर २०० ते ३०० फुट खोल असली पाहिजे होती मात्र आज हि विहीर ६० फुटापर्यंत असून हि विहीर व या विहिरीवरील झालेली १५ ते २० वेळेचे खोदकाम हा मोठा संशोधनाचा विषय ठरत आहेत व एवढे करूनही उन्हाळ्यात महिलांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
- कल्पना दिनकर सूर्यवंशी, पिळकोस
पिळकोस ग्रामपंचायातीकडून गावात कित्येक वर्षापासून मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने आम्हा महिलांना पिण्यासाठी व वापरासाठी एक ते दोन किमी दुरून पाणी आणावे लागत असून कपडे धुण्यासाठीही दररोज पायपीट करावी लागत असून दरवेळेस खोटी आश्वासन देऊन नवनवीन ग्रामपंचायत सद्ष्य व सरपंच निवडून आलेत मात्र कुणीही पाण्याची समस्या कायमची सोडली नाही, वीस वर्षापासून गावाला लाभलेले गावातील सरपंच व ग्रामसेवक यांना फक्त रस आहे तो दरवषी विहिरीचे काम करायचा मात्र ते काम किती होते व विह्ररीला किती पाणी येते व गावातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होतो का यात कुणाला काडीमात्र रस नाही.
- रंजना सुभाष वाघ, पिळकोस
पिळकोस ग्रामपंचायत प्रसासानाला गावतील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळो या, ना मिळो याबाबतीत काही एक देणे घेणे नसून आजपर्यंत गावातील नागरिकांना व महिलावर्गाला सतत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. ग्रामपंचायतीची मालकीची गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर हि गिरणा नदीकाठाला असून देखील गावाला कित्येक वर्षापासून उन्हाळ्यात व नदीचे आवर्तन बंद झाल्यास दुष्काळाच्या यातना सहन कराव्या लागत आहे. गावात ज्यावेळेस पाण्याची टंचाई भासते त्या ङ्क्तत्या वेळेस मी माङया स्वताच्या खर्चातून ट्यानकर ने गावात पाणीपुरवठा करत गावातील महिलांना पाणी उपलब्ध करून देत आहे.
- सुनील मोतीराम जाधव, सामाजिक कार्यकर्ता, पिळकोस.
गावात जलस्वराज्य प्रकल्प योजना राबवली असून या योजनेतून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी पन्नास हजार लिटरचा जलकुंभ असून देखील नदीला मुबलक पाणी असताना देखील हा जलकुंभ पंधरा मिनटात रिकामा होतो व आज तर एक हंडा देखील पाणी मिळू शकत नसून याबाबतीत ग्रामपंचायत प्रशासनाला विचारणा केली तर उडवाङ्क्तउडवीचे उत्तर दिली जातात. मग पाण्यासाठी आता दाद मागावी तरी कुठे.
- ललित मोहन वाघ, ग्रामस्थ, पिळकोस.


 


Web Title: Deep water scarcity in Pelakos village
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.