शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

मोहाडीत परिचारिका प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 23:10 IST

दिंडोरी : परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा आहेत. डॉक्टर रुग्णांचे निदान करीत असले तरी रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करण्यात परिचारिकांचे महत्त्व जास्त आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.

ठळक मुद्देकेंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांची उपस्थिती : परिचारिकांचे योगदान मोठे

दिंडोरी : परिचारिका या डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील दुवा आहेत. डॉक्टर रुग्णांचे निदान करीत असले तरी रुग्णांवर उपचार व सुश्रुषा करण्यात परिचारिकांचे महत्त्व जास्त आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी काढले.नाशिक जिल्हा रुग्णालय अंतर्गत नव्याने स्थापित झालेल्या मोहाडी येथील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद गटनेते प्रवीण जाधव, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के. आर. श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार, भाजपचे बापूसाहेब पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयुष्यमान भारत योजना अंतर्गत स्थानिक १० लाभार्थ्यांना गोल्डन हेल्थ कार्ड देण्यात आले.

यावेळी डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यातील परिचारिकांना चांगल्या वातावरणात उभ्या केलेल्या प्रशिक्षण केंद्राचा लाभ मिळेल. शिक्षण आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल अनुभव ग्रामीण पातळीवर सहजतेने उपलब्ध होईल. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रांमुळे आरोग्यसेवा बळकट होण्यास मदत होते, असेही पवार यांनी सांगितले. नीलेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर सागर अस्माळ यांनी आभार मानले. यावेळी मोहाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. छगन लोणे, डॉ. कल्पेश चोपडे, डॉ. राहुल कुशारे, मंडल अधिकारी भगवान काकड, तलाठी किरण भोये, गोरख गायकर, आदी उपस्थित होते.मी व विद्यमान केंद्रीयमंत्री जिल्हा परिषदेचे सदस्य असताना या प्रशिक्षण केंद्राला मान्यता मिळाली आहे. जागा, निधी यासाठी आवश्यक कायदेशीर बाबींची पूर्तता केली. त्यासाठी ग्रामपंचायत व गावातील लोकप्रतिनिधींनी विशेष श्रम घेतले. परंतु, उद्घाटनाच्या वेळी गावाला विश्वासात घेतले नाही. ज्या पद्धतीने प्रशिक्षण केंद्राचे लोकार्पण सोहळा तातडीने पार पडला त्याच पद्धतीने पुढील कामेही पार पाडावीत.- प्रवीण जाधव, माजी गटनेते, जिल्हा परिषद 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्य