शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सातपूरला आयोसोलेशन सेंटरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 00:52 IST

सातपूर : आम्ही सातपूरकर समूहाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या सामाजिक उपक्रमास सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेवर विश्वास ठेवून शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकीतून आयसोलेशन सेंटर

सातपूर : आम्ही सातपूरकर समूहाने समाजापुढे आदर्श ठेवला आहे. या सामाजिक उपक्रमास सर्वप्रकारचे सहकार्य केले जाईल; मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेवर विश्वास ठेवून शासनाच्या त्रिसूत्री नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले.सातपूर येथे सुरू करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. सामाजिक बांधिलकीतून आयसोलेशन सेंटर उभारल्याबद्दल आयुक्तांनी सातपूरकरांचे कौतुक केले. हॉस्पिटल उभारणीसाठी डॉक्टर, फिजिशियन यांचा ताफा तयार करण्यासाठी खूप वर्षे लागतात. तरीही मी हरणारा नसून लढणारा आहे. नागरिकांच्या सहकार्याने हे संकट दूर करण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहील. माझी पत्नी, मुलगा कोरोनामुळे बाधित असले तरी मी लढत राहणार असल्याचेही आयुक्त जाधव यांनी सांगितले. नगरसेवक सलिम शेख यांनी प्रास्ताविक केले. या आयसोलेशन सेंटरसाठी नगरसेविका इंदुबाई नागरे, शशिकांत जाधव, यांच्या पुढाकाराने ७० बेड मिळालेत. त्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला. यावेळी नगरसेवक शशिकांत जाधव, योगेश शेवरे, भागवत आरोटे, नगरसेविका हेमलता कांडेकर, इंदुबाई नागरे, सामाजिक कार्यकर्ते विक्रम नागरे, संजय जाधव, गौरव जाधव, नितीन निगळ, दीपक मौले, लखन कुमावत, निलेश जाधव, अभिजित शिंदे, बाळासाहेब भोजने, डॉ. अमोल वाजे, संदीप सोनवणे, सचिन सिन्हा, समाधान देवरे आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल