नाशिक : आषाढी एकादशीसाठी शहरातील विठ्ठल मंदिरे रोषणाई सजावटीसह सज्ज झाली असून, उपवासाचे पदार्थ तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, फळे यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत सोमवारी (दि.३) रात्री उशिरापर्यंत लगबग दिसून येत होती. शहरातील कॉलेजरोड, गंगाघाट, सिडको, सातपूर, मेरी, नाशिकरोड आदी ठिकाणच्या मंदिरांमध्ये विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्तीवर रंगकाम करून त्या उजळविण्यात आल्या. फुलांची, आकर्षक वेशभूषा, दागिन्यांनी सजावट करण्यात आली. मंदिरांच्या कळसांवरही विद्युत रोषणाई करण्यात आली. मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून, त्यांची सांगता मंगळवारी केली जाणार आहे. उपवासाचे पदार्थ, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत लगबग दिसत होती. पावसामुळे भाज्यांचा तुटवडा जाणवत असून, भाव तेजीत होते.
आषाढी एकादशीसाठी मंदिरांमध्ये सजावट
By admin | Updated: July 4, 2017 01:28 IST