अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देण्याबाबत आठ दिवसांत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:16 AM2021-07-28T04:16:17+5:302021-07-28T04:16:17+5:30

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती स्वाती भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिकेच्या ३७२ अंगणवाड्या असून, त्यात सुमारे ...

Decision within eight days to provide nutritious food to Anganwadi children | अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देण्याबाबत आठ दिवसांत निर्णय

अंगणवाडीतील मुलांना पोषण आहार देण्याबाबत आठ दिवसांत निर्णय

googlenewsNext

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीची बैठक सभापती स्वाती भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

महापालिकेच्या ३७२ अंगणवाड्या असून, त्यात सुमारे सतराशे मुले येत होती. गेल्या वर्षी २३ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर शासनाने आदेश दिल्यानंतर केवळ दोन वेळाच पोषण आहार घरपाेच देण्यात आला. नंतर मात्र, ताे देण्यात आला नाही. त्यातच प्रस्थापित बचत गटांऐवजी नवीन बचत गटांना काम देण्यावरून घोळ सुरू झाला, तो आजतागायत मिटला नाही. दरम्यान, यासंदर्भात बैठकीत स्वाती भामरे यांनी लोकमतचा संदर्भ देऊन प्रश्न उपस्थित केल्यानंतर उपआयुक्त अर्चना तांबे यांनी नवीन बचत गट नेमण्यासाठी आठ दिवसांत जाहिरात देऊन गट नियुक्त करण्यात येतील आणि त्यानंतर पोषण आहार पुरवला जाईल. नवीन आणि सर्व विभागांतील बचत गटांना त्या त्या भागात पोषण आहार पुरवण्याचे काम द्यावे, अशी सूचना स्वाती भामरे यांनी केली.

दरम्यान, महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून निविदा स्तरावरच गोंधळ सुरू असून त्याविषयी भामरे, समिना मेमन आणि प्रतिभा पवार यांनी जाब विचारला. सात कोटी रुपयांच्या या ठेक्यासाठी वारंवार अटी - शर्ती बदलून निविदा का मागवल्या जात आहेत, असा प्रश्न करीत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेविषयी शंका व्यक्त केली. सध्या प्राप्त झालेल्या निविदांमध्ये एक निविदाधारक अगोदरच काळ्या यादीत असून, दुसऱ्या निविदाधारकाला काम देण्याऐवजी आयुक्तांनी फेरनिविदा काढण्याचे आदेश दिल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा निविदा काढल्यास त्या मंजूर होईपर्यंत समितीचा कार्यकाल संपुष्टात येणार आहे. त्यामुळे फेरनिविदा काढण्यास सर्व सदस्यांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात बुधवारी (दि. २८) समिती सदस्य आयुक्तांची भेट घेणार आहेत. बैठकीस उपआयुक्त शिवाजी आमले, वित्त अधिकारी महाजन उप‌स्थित होते.

इन्फो...

आंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपयांचे मानधन वाढवून देण्याचा ठराव महासभेत करण्यात आला. मात्र, त्यांना वाढीव मानधन तर सोडाच; परंतु जून महिन्याचे मानधन मिळाले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. समितीने तातडीने वाढीव मानधन द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: Decision within eight days to provide nutritious food to Anganwadi children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.