शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

शिवसेनेची याचिका निकाली, आता आयुक्तांकडे फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:23 IST

महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी उच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलली याचिका अद्याप निकाली काढण्यात आली

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून सुरू असलेल्या वादाचे निराकरण करण्यासाठी उच्च न्यायालयात शिवसेनेने दाखल केलली याचिका अद्याप निकाली काढण्यात आली असून, आता या वादाचा फैसला विभागीय आयुक्तांच्या कोर्टात होणार आहे. मंगळवारी (दि.१२) यासंदर्भात महापौर, नगरसचिव तसेच सर्व गटनेते आणि आयुक्तांना सकाळी ११ वाजता त्यांची बाजू मांडण्यासाठी बोलविण्यात आले आहे.महापालिकेच्या स्थायी समितीत एक सदस्य नियुक्तीवरून हा वाद सुरू झाला आहे. भाजपाचे महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या तुलनेत असलेले पक्षीय तौलनिक संख्याबळ हे सातपूर येथील सुदाम नागरे या नगरसेवकाच्या निधनामुळे घटले आहे. साहजिकच स्थायी समितीत भाजपाच्या नऊ ऐवजी आठ सदस्य होतात आणि त्यांची कमी झालेली एक जागा शिवसेनेला मिळते त्यामुळे यापक्षाचे स्थायी समितीत पाच सदस्य होतात, असा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते आणि गटनेता विलास शिंदे यांचा दावा आहे. यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.तर सेना पुन्हा न्यायालयात दाद मागणारउच्च न्यायालयाने यापूर्वी याचिका दाखल करून घेतल्याने शिवसेनेला मोठी अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने याचिका निकाली काढली गेली आहे. अर्थात, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांच्या दाव्यानुसार याचिका निकाली काढली गेलेली नाही. विभागीय आयुक्तांकडून समाधानकारक निर्णय झाला नाही तर उच्च न्यायलयात दाद मागता येऊ शकते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाShiv Senaशिवसेना