शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या स्थायी सदस्यांचा उद्या फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:46 IST

महापालिकेच्या लाख मोलाच्या स्थायी समितीचे सभापती सोडण्यास चार सदस्य तयार नाहीत. त्यामुळे आता मुंबईत सोमवारी (दि.२३) या सर्वांना बोलावून निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापालिकेच्या लाख मोलाच्या स्थायी समितीचे सभापती सोडण्यास चार सदस्य तयार नाहीत. त्यामुळे आता मुंबईत सोमवारी (दि.२३) या सर्वांना बोलावून निर्णय घेतला जाणार असल्याचे वृत्त आहे. गेल्यावेळी आमदारांना कोटा वाटून देण्यात आला होता आणि त्यानुसार त्यांनी सदस्य दिले होते. आता मात्र अगोदरचे चार सदस्य राजीनामा देत नसल्याने आता त्यांच्यावर अन्य इच्छुकांचा दबाव वाढला आहे. भाजपाचा सदस्य नियुक्तीचा हा घोळ दि. २८ फेब्रुवारीपर्यंत सुरूच राहण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य फेबु्रवारीअखेरीस निवृत्त होणार आहेत. त्यामुळे नूतन सदस्य नियुक्तीसाठी येत्या गुरुवारी (दि. २८) विशेष महासभा महापौर रंजना भानसी यांनी बोलावली आहे. परंतु भाजपातच या विषयावरून रणकंदन सुरू झाले आहे. भाजपाचे दिनकर पाटील, उद्धव निमसे, भाग्यश्री ढोमसे आणि पुष्पा आव्हाड या सदस्यांना एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांचा राजीनामा घेण्याची तयारी सुरू आहे, परंतु महापौर आणि उपमहापौरपदाच्या अडीच वर्षांपूर्वीच म्हणजे सव्वा सव्वा वर्षे कालावधीसाठीच मुदत देऊन त्यांचे राजीनामे घेण्याचे ठरविण्यात आले होते. भाजपाचे महापालिकेत बहुमत असल्याने त्यांचा राजीनामा घेऊन त्या जागी अन्य नगरसेवकांना संधी देणे शक्य होते. परंतु त्यांचे राजीनामे घेतले नाहीत, मग स्थायी समितीच्या बाबतीच वर्षभरात निवृत्त करण्याचा प्रकार कशासाठी? असा प्रश्न स्थायी समितीच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे हा विषय प्रलंबित आहे. मध्यंतरी पालकमंत्री गिरीश महाजन हे या विषयावर तोडगा काढण्यासाठी दाखल झाले होते, परंतु त्यांना वेळ न मिळाल्याने शनिवारी (दि. २३) ते नाशिकमध्ये येऊन चर्चा करणार होते, परंतु तेही शक्य न झाल्याने आता सोमवारी (दि. २५) सर्व इच्छुकांना आणि पदाधिकाऱ्यांना मुंबईत पाचारण करण्यात आले आहे. त्यात निर्णय होणार आहे.दरम्यान, सदस्य नियुक्तीसाठी अगोदरचे सदस्य राजीनामे देत नसल्याने अन्य इच्छुकांची मात्र अडचण झाली आहे. अन्य इच्छुकांचा दबाव वाढला आहे. गेल्यावेळी पद नियुक्तीच्या वेळी शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांना चार, सीमा हिरे यांना तीन, तर फरांदे यांंना दोन जागांचा कोटा दिला होता आताही तो तसाच ठेवला जाण्याची शक्यता असून, त्यामुळे इच्छुकांच्या आमदारांकडे चकरा सुरू झाल्या आहेत.भाजपा निरंकुशभाजपामध्ये यापूर्वी पक्षाने एखादा निर्णय घेतला तर त्याला आव्हान देण्याची पद्धत नव्हती. मात्र आता भाजपात ज्यांचा शब्द प्रमाण मानला जाईल असा मोठा नेता नाही. त्याच प्रमाणे अन्य नेतेदेखील वाढल्याने आता निर्णयाला विरोध करण्याचे प्रकार सुरू झाले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक