शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:10 IST

राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारकडून दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानुसार शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

ठळक मुद्देमहाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला सकारात्मक प्रतिसाद

नाशिक : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधासाठी लागू केलेल्या ‘ब्रेक द चेन’च्या निर्णयात बदल करण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी सरकारकडून दोन दिवसांचा वेळ मागण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या आश्वासनानुसार शुक्रवारी दुकाने सुरू करण्याचा निर्णय स्थगित करून सोमवारपासून व्यापार सुरळीत सुरू करण्याचा ठराव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या ऑनलाइन बैठकीत करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर तर्फे गुरुवारी ‘ब्रेक द चेन व व्यापार बंद’ विषयावर राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकारी व सभासदांची ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत चेंबरचे उपाध्यक्ष शुभांगी तिरोडकर, अनिलकुमार लोढा, नाशिक शाखा चेअरमन संजय दादलिका, पुणे व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष फत्तेचंद राका, अमरावतीचे विनोद कलंत्री, कोल्हापूरचे संजय शेटे, सोलापूरचे राजू राठी, कमलेश धूत, पोपटलाल ओस्तवाल, हर्षवर्धन संघवी, अश्विन मेहाडिया आदी पदाधिकारीसह व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या निर्णयाची दोन दिवस वाट बघावी, असे मत मांडले. त्यामुळे शुक्रवारी दुकाने न उघडता सोमवारपासून दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे चेंबरकडून सांगण्यात आले आहे. ललित गांधी यांनी आभार मानले. बैठकीत कॅटचे उपाध्यक्ष मेहुल थोरात, अजित सुराणा, प्रवीण पगारिया, मुस्ताक शेख, सागर नागरे, विनी दत्ता आदीसह मोठ्या प्रमाणात व्यापारी सहभागी झाले होते.

टॅग्स :NashikनाशिकShoppingखरेदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे