शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2018 20:16 IST

येथे सोमवारी व एकादशीच्या दिवशी मांसविक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू असून, त्याचे कसोशीने पालन करण्यात येते. यावर्षी बकरी ईद एकादशीच्या दिवशी आली असून, शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरात पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत कुर्बानी एकादशीच्या दिवशी न ठेवता आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ठेवण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन इतर समाजाच्या भावना जपत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

देवळा : येथे सोमवारी व एकादशीच्या दिवशी मांसविक्र ीची दुकाने बंद ठेवण्याचा प्रघात अनेक वर्षांपासून सुरू असून, त्याचे कसोशीने पालन करण्यात येते. यावर्षी बकरी ईद एकादशीच्या दिवशी आली असून, शहरातील मुस्लीम समाजबांधवांनी शहरात पाळली जाणारी परंपरा कायम ठेवत कुर्बानी एकादशीच्या दिवशी न ठेवता आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ठेवण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेऊन इतर समाजाच्या भावना जपत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.  आगामी काळात येणाºया सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या सभागृहात तालुक्यातील पोलीसपाटील, सरपंच, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, नगरसेवक यांची बैठक घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यावेळी उपस्थित होते. गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन गावात मतदान घ्यावे व कायमस्वरूपी दारूबंदी करावी, उत्सव काळात मद्यपींचा उपद्रव थांबविण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करतील; परंतु यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे राहणार असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी यावेळी केले.  बैठकीत उत्सव काळात वाद्यांच्या आवाजाची तीव्रता व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, ग्रामीण भागात अवैध देशी दारू विक्र ी तसेच गावठी दारूचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली. मद्यपींचा वाढता उपद्रव सध्या सर्वत्र चिंतेचा विषय झाला आहे. उत्सव काळात त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. शांतता प्रस्थापित होण्यासाठी मद्यपींवर कारवाई करण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.बैठकीस पंकज अहिरराव, सुनील पवार, नगरसेवक बाळासाहेब अहेर, प्रदीप अहेर, सगीरभाई शेख, बशीर शेख, आकील शेख, नईम शेख, रईस तांबोळी, कबीर तांबोळी, हेमंत पगार, काशीनाथ पवार, भाऊराव पवार, अनिता अहेर, सीमा अहिरे, अश्विनी बच्छाव, गंगाधर बच्छाव उपस्थित होते. 

टॅग्स :PoliceपोलिसMuslimमुस्लीम