शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मनसेचा निवडणूक लढविण्याचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 00:47 IST

महाराष्ट नवनिर्माण सेनेने राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा अंतिम फैसला आता सोमवारी (दि.३०) होणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी पाचारण केले आहे.

नाशिक : महाराष्ट नवनिर्माण सेनेने राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची किंवा नाही याचा अंतिम फैसला आता सोमवारी (दि.३०) होणार असून, पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यानिमित्ताने पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व राज्यातील इच्छुक उमेदवारांना बैठकीसाठी पाचारण केले आहे. या बैठकीत सर्वांचे मत जाणून घेतल्यानंतर ठाकरे हे निवडणुकीविषयी आपला निर्णय जाहीर करतील. ज्याअर्थी ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे त्याअर्थी मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, असा अंदाज बांधला जात आहे.राज ठाकरे यांच्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे न करता राज्यातील राजकीय वातावरण तापविण्यास सुरुवात केली असली तरी, विधानसभा निवडणुकीत मनसे रिंगणात उतरेल किंवा नाही याविषयी साशंकता व्यक्त होत आहे. मध्यंतरी मनसे कॉँग्रेस आघाडीत सहभागी होऊन निवडणूक लढवेल अशी चर्चा रंगली होती; परंतु कॉँग्रेसकडून मनसेला सोबत घेण्याबाबत सकारात्मकता न दर्शविल्याने ही चर्चा मागे पडली; मात्र त्याचवेळी ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात घेतलेली जाहीर भूमिका व त्यातून त्यांनी अन्य पक्षांना विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यासाठी घातलेली गळ पाहता, महाराष्टÑ नवनिर्माण सेना निवडणूक लढविणार नाही, असा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली गेली होती. त्यामुळे अखेर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी मनसेने विधानसभा निवडणूक लढविण्या- बाबतची तयारी सुरू केली. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांनी जाऊन इच्छुकांच्या मुलाखती घेण्याबरोबरच विधानसभा मतदारसंघ- निहाय राजकीय परिस्थिती जाणून घेतली; मात्र त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होऊन पंधरा दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केलेली नसल्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने मनसेला काही तरी निर्णय लवकर घ्यावा लागणार असून, त्यापार्श्वभूमीवर सोमवारी मुंबईत सकाळी १० वाजता राज ठाकरे यांनी पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, सर्व जिल्हाध्यक्ष व इच्छुक उमेदवारांना पाचारण केले आहे. पक्षाचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही, त्यांनी बैठकीसाठी येऊ नये अशा सूचनाही पक्षाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षाची अधिकृत भूमिका ठाकरे यांच्याकडून जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसे