शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खासगी शाळांनी निम्मेच शुल्क आकारण्याचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 16:43 IST

कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला असल्याने यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे देखील पालकांना शक्य नसल्याची बाब सदस्य मनिषा पवार यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर उपरोक्त ठराव करून त्याचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षण समितीचा निर्णय : शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम. शाासनाच्या सुचना आल्यानंतर शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात आले.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : कोरोनाच्या महामारीने अनेकांचा रोजगार हिरावून नेला असून, सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. त्यांच्या मालाला भाव नसून, आर्थिक चणचणीत पाल्यांचे शिक्षण करणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीत सर्व खासगी शाळांनी त्यांच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के कपात करावी असा ठराव जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. त्याच बरोबर शासनाचे आदेश आल्याशिवाय जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू न करण्याचे ठरविण्यात आले आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यात आली. त्यात कोरोनामुळे रोजगारावर परिणाम झाला असल्याने यंदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरणे देखील पालकांना शक्य नसल्याची बाब सदस्य मनिषा पवार यांनी निदर्शनास आणून दिली. त्यावर उपरोक्त ठराव करून त्याचा शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठरावास नुतन आहेर यांनी अनुमोदन दिले. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. शाासनाच्या सुचना आल्यानंतर शाळा सुरू करण्याचे ठरविण्यात आले. मात्र शाळा सुरू करण्यापुर्वी कोरोनाचा संसर्ग होणार नाही यासाठी यासाठी काटेकोर पालन करण्यात यावे अशा सुचना करण्यात आल्या. शाळा सुरू करण्याबाबत सर्व गट शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व्हेक्षण सुरू असून, चालू शैक्षणिक वर्षामध्ये पुर्णवेळ किंवा अर्धवेळ किती शाळा सुरू होतील तसेच आॅनलाईन पद्धतीने किती शाळांना शिक्षण घेता येणे शक्य आहे.याबाबत माहिती संकलित करण्याचे काम अंतीम टप्प्यात असल्याची माहिती शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी दिली. यासभेस जे. डी. हिरे, मिना मोरे, सुनीता पठाडे यांनीही सहभाग नोंदविला.

टॅग्स :Educationशिक्षणnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद