शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दशक्रिया विधीचे कंपाउंड पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 00:06 IST

आडगाव ग्रामस्थांचा विरोध झुगारून सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम करताना ठेकेदाराने दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडल्याने आडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडून ठेकेदाराचा अतिक्रमण करण्याचा डाव असल्याचा आरोप करत काम बंद करण्याची मागणी केली आहे.

नाशिक : आडगाव ग्रामस्थांचा विरोध झुगारून सुरू करण्यात आलेल्या म्हाडाच्या पंतप्रधान आवास योजनेचे काम करताना ठेकेदाराने दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडल्याने आडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले असून, दशक्रिया विधीचे कंपाउंड तोडून ठेकेदाराचा अतिक्रमण करण्याचा डाव असल्याचा आरोप करत काम बंद करण्याची मागणी केली आहे.आडगावी म्हाडा प्रकल्पाला ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे दीड वर्षापूर्वी हा वाद चांगलाच गाजला होता. प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर आडगावकरांनी बहिष्कार टाकला होता, पण ग्रामस्थांच्या विरोधाला झुगारून कामाला सुरुवात करण्यात आली. आता हा बहुचर्चित प्रकल्प पूर्णत्वास येत असताना आडगाव म्हाडा प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या जागेत दशक्रिया शेड आहे. त्या दोघांच्या मध्ये कंपाउंड असताना ते अचानक तोडून पुन्हा कंपाउंड बांधण्याचा अट्टाहास केला जात आहे. ठेकेदाराच्या या कृतीवर संशय घेत, ग्रामस्थांनी काम बंद पाडले. मात्र ग्रामस्थ माघारी फिरताच पुन्हा कंपाउंड तोडण्यास सुरुवात करण्यात आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, पुन्हा आंदोलन छेडण्याची तयारी केली आहे.सदरचा प्रकार म्हणजे दशक्रिया शेडच्या जागेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप करत आडगावच्या नागरिकांनी कंपाउंड कामाला विरोध सुरू केला आहे. पूर्वी कंपाउंड असताना तोडण्याची गरज काय, असा सवाल करत म्हाडाने कंपाउंडला लागून भिंत बांधावी, अशी मागणी केली आहे. यावेळी आडगाव पोलीस पाटील एकनाथ मते, शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, नितीन माळोदे, सुरेश मते, बालाजी माळोदे, पोपट शिंदे, विलास माळोदे, मयूर मोरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक