शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सोने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 15:30 IST

नायगाव : सोने उजळून देण्याच्या बहाण्याने हातात घेतलेले सुमारे सहा तोळे सोने अज्ञात भामट्याने हातोहात लंपास केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे घडली.चोरीच्या नव्या फंडयाने परिसरात खळबळ उडाली आहे.

नायगाव : सोने उजळून देण्याच्या बहाण्याने हातात घेतलेले सुमारे सहा तोळे सोने अज्ञात भामट्याने हातोहात लंपास केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील पास्ते येथे घडली.चोरीच्या नव्या फंडयाने परिसरात खळबळ उडाली आहे.पास्ते येथील काजीखोरा भागात मंगळवारी (दि. ४) दुपारी दोनच्या सुमारास सरदवाडी रस्त्याने मोटारसाईकलवर आलेल्या अज्ञात चोरट्याने आव्हाड वस्तीवरील जनाबाई विठ्ठल आव्हाड व सिंधुबाई अशोक आव्हाड या महिलांकडे जाऊन सोने-चांदी उजळुन देतो असे म्हणून या महिलांना गळ घातली. या दोन्ही महिलांनी गळ्यातील मंगळसुत्र, फुल, कानातील वेल, डोरले व पोत असे सर्व दागिने या भामट्याच्या हातात दिले.यावेळी एका महिलेला घरातील एका पातिल्यात पाणी टाकून देण्याची विनंती केली. हे दागिने त्या पातेल्यात टाकण्याच्या वेळेस हातचलाखी करत स्वताच्या खिशात टाकले .पाणी असलेले पातेले गँसवर ठेवत महिलांशी गप्पामारत दागिने उजळण्यासाठी किमान अर्धातास गँस सुरू ठेवण्यास सांगितले .तोपर्यंत मी बाहेरून येतो असे सांगुन हा भामटा बाहेर पडला. दरम्यान अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ होऊनही कारागीर का आला नाही या विचाराने या दोन्ही महिलांची चलबिचल झाली. आणखी थोड्या वेळाने गँसवरील पातेले खाली घेऊन बघितले असता त्यात एकही सोन्याचा दागिना दिसत नसल्याचे बघुन या महिलांनी आरडाओरडा केला. मात्र कारागीर येत नसल्याचे लक्षात येताच आपल्याला फसविल्याचे लक्षात येताच महिलांना रडु कोसळले. घरातील , सर्व माणसांना घडलेला प्रकार सांगितला. यावेळी पुतण्या राजु आव्हाड यांनी सिन्नर पोलिसात अज्ञात चोरट्याच्या विरोधात तक्र ार दाखल केली.---------------------गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे.चोरी करण्याच्या पध्दतीतही बदलत झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दागिने उजळून देण्याच्या पध्दतीने काही दिवसांपूर्वी चिंचोली येथे ही दागिने लांबविले होते.वारंवार होणार्या घटनां घडुनही नागरिक सतर्क होत नसल्यामुळेच चोरटे निर्धावले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक