शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आई रागवल्याने गायब झालेल्या मुलाचा सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 01:16 IST

घरातून शाळेची तयारी करून शाळेत न जाता इतरत्र भटकत असलेल्या मुलास दोन फटके मारून शाळेत का जात नाही, असे आईने ओरडल्याने गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाचवीतील मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २८) उघडकीस आली़ अनिकेत योगेश मोकाशे (१०, रा़ मराठी शाळेमागे, वडाळागाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़

इंदिरानगर : घरातून शाळेची तयारी करून शाळेत न जाता इतरत्र भटकत असलेल्या मुलास दोन फटके मारून शाळेत का जात नाही, असे आईने ओरडल्याने गत दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पाचवीतील मुलाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़ २८) उघडकीस आली़ अनिकेत योगेश मोकाशे (१०, रा़ मराठी शाळेमागे, वडाळागाव) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे़  इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडाळागावातील शाळेच्या पाठीमागे योगेश मोकाशे हे पत्नी संगीता, मुलगी अंजली, गीतांजली, मुलगा अनिकेत व ज्ञानेश्वर यांच्यासमवेत राहत असून, मजुरी व फूल विक्रीचा व्यवसाय करतात़ त्यांचा दहा वर्षीय मुलगा अनिकेत हा केबीएच शाळेत पाचवीला शिकत होता़ मात्र, दोन दिवसांपासून तो शाळेत येत नसल्याचे त्याच्या वर्गशिक्षिकेने मंगळवारी (दि़ २५) सकाळी संगीता मोकाशे यांना फोन करून सांगितले़ अनिकेत दररोज शाळेची तयारी करून दप्तर घेऊन जात असल्याचे वर्गशिक्षिकेस सांगितले असता त्यांनी शाळेत न येता इतरत्र भटकत असल्याचे मुलांनी सांगितल्याची माहिती दिली़  अनिकेत दुपारी सव्वाबारा वाजता घरी आल्यानंतर आई संगीता हिने शाळेत गेला होता का विचारले असता मी गेलो होतो असे खोटे सांगितले़ यावर शाळेतून शिक्षकांचा फोन आला होता, तू दोन दिवसांपासून शाळेत आला नसल्याचे सांगितले असे म्हणून दोन फटके मारले होते़ यानंतर उद्यापासून मी शाळेत जाईल, असे अनिकेतने आईला सांगितले होते़ त्यानुसार बुधवारी (दि़२६) सकाळी नेहमीप्रमाणे आईने त्यास शाळेसाठी उठविले व फूल विक्रीच्या कामासाठी निघून गेली़ दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घरी आल्यानंतर मुलांनी सांगितले की, अनिकेत सकाळपासून बाथरूमला गेला तो परत आलाच नाही़  मोकाशे कुटुंबीयांना त्याचे दप्तरही घरीच असल्याचे दिसल्याने, शाळेत जायचे नाही म्हणून कुठेतरी निघून गेला असावा असे समजून त्याचे आजी-बाबा, नातेवाईक तसेच मित्रांकडे शोध घेतला; मात्र तो सापडला नाही़  अखेर संगीता मोकाशे यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली़ शुक्रवारी (दि़ २८) दुपारी वडाळा शिवारात आयटीपार्कसमोर जॉगिंग ट्रॅकशेजारी असलेल्या एका विहिरीत लहान मुलाचा मृतदेह असल्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना मिळाली़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढला असता तो अनिकेतचा असल्याचे समोर आले़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़आई मी उद्यापासून रोज शाळेत जाईल.़़शाळेची तयारी करून घरातून निघणारा मात्र शाळेत न जाता वडाळागावातील भिंडीबाबाची दर्गा येथे बसून राहणाऱ्या अनिकेतला मंगळवारी दुपारी घरी आल्यानंतर आईने त्याला शाळेत गेला होतास का? असे विचारले़ यावर अनिकेतने हो सांगितले होते, तेव्हा खोटे बोलल्याने आईने त्यास दोन फटके मारून तू शाळेत जात नसल्याचे शिक्षिकेने फोन करून सांगितले.यावर पुन्हा आईला खरे सांगून मी शाळेत न जाता दर्ग्यावर बसल्याचे सांगितले होते़ तसेच उद्यापासून रोज शाळेत जाईल, खाडे करणार नाही असे सांगितले होते़; मात्र दुसºया दिवशी सकाळी त्यास शाळेत जाण्यासाठी उठविले असता तो बाहेर पडला; मात्र घरी परतलाच नाही़

टॅग्स :Deathमृत्यूNashikनाशिक