कळवण : कळवण तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतुत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसांपूर्वी असलेल्या अवकाळी पावसाने कांदे, कांदा उळे, मका, बाजरी, सोयाबीन भात, नागली, वरई अशा सर्वच पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला असुन शेती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.पुढील हंगाम कसा करावा अशा द्विधा मनिस्थतीत बळीराजा सापडला आहे. शासनातर्फे दिली जाणारी हेक्टरी आठ हजार रु पये मदत अत्यंत तुटपुंजी असून हि मदत वाढवून मिळावी तसेच पिक विम्याचीही मदत शेतकºयांना तातडीने द्यावी तसेच सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ बच्छाव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, सहसंपर्क प्रमुख संभाजी पवार, शहर प्रमुख साहेबराव पगार, विभाग प्रमुख शितलकुमार अहिरे, शिववाहतूक ग्रामीण जिल्हा प्रमुख जितेंद्र वाघ, उपतालुकाप्रमुख डॉ. दिनेश बागुल, राजू वाघ, विनोद भालेराव, उपशहरप्रमुख आप्पा बुटे, विनोद मालपुरे, ग्राहक संरक्षण शहरप्रमुख किशोर पवार, ललित आहेर, बोरदैवतचे सरपंच गंगाधर चव्हाण आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
रोख मदतीसह सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा : मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 18:47 IST
कळवण : कळवण तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घालून १०० टक्के पिकांचे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतुत्वाखाली तहसीलदार बी. ए. कापसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रोख मदतीसह सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा : मागणी
ठळक मुद्देकळवण : शिवसेनेच्या वतीने तहसिलदारांना निवेदन