शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीचा सर्वच पात्र शेतकऱ्यांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:10 IST

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रमाणिकीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र काही कारणास्तव प्रमाणिकीकरण न झाल्यास त्यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येणार आहे. योजनेसाठी आधार लिंकिंग आणि प्रमाणिकरणात येणाºया संभाव्य अडचणींमुळे कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केले जात असल्याचे समजते.

ठळक मुद्देविशेष बाब : प्रमाणिकीकरण न झाल्यास करणार उपाययोजना

नाशिक : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रमाणिकीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र काही कारणास्तव प्रमाणिकीकरण न झाल्यास त्यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येणार आहे. योजनेसाठी आधार लिंकिंग आणि प्रमाणिकरणात येणाºया संभाव्य अडचणींमुळे कुणीही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय केले जात असल्याचे समजते.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्राथमिक प्रमाणिकरणाला प्रारंभ झालेला आहे. पात्र शेतकºयांची नावे पोर्टलवर जाहीर झाल्यानंतर त्यांचे प्रमाणिकीकरण केले जात आहे. त्यामध्ये आधारकार्ड, कर्ज खाते आणि कर्जाची रक्कम यांची माहिती जुळल्यास संबंधित शेतकºयाचे प्रमाणिकरण होते आणि त्यानंतर पात्र शेतकºयाच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा केली जाते. प्रमाणिकीकरणासाठी अनेक अडचणीदेखील समोर आलेल्या आहेत. प्रमाणिकीकरण करताना शेतकºयांच्या बोटाचे थमइम्प्रेशन आणि डोळ्यांच्या रेषा जुळत नसल्याने अडचणी निर्माण होत आहे.सदर प्रमाण अत्यल्प असले तरी प्रमाणिकरण न झाल्यास संबंधित शेतकºयाला लाभ मिळण्यास अडचण निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केली जात असताना येणाºया तांत्रिक अडचणी सोडविणे तसेच धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी शासनाकडून तयारी केली जात असल्याचेही समजते.आधार खात्याशी ओळख जुळविण्यात अडचणीवयोमानानुसार बोटाचे ठसे, डोळ्यांचे स्कॅनिंगमध्ये फरक पडत असल्याने आधार खात्याशी त्यांची ओळख जुळत नसल्याची बाब अनेक प्रकरणांमध्ये समोर आलेली आहे. काही शेतकºयांचे आधार काढताना असा प्रसंग उद्भवला आहे. शेतकºयांच्या शारीरिक क्षमतांचा विचार करता प्रमाणिकीकरणाला येणाºया अडचणी लक्षात घेऊन पात्र असतानाही प्रमाणिकरणास अडचणी आल्यामुळे अशा शेतकरी वंचित राहू नये यासाठीदेखील धोरणात्मक निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक