शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीच्या सभापतिपदावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 00:57 IST

महापालिकेच्या अर्थकारणातील सर्वाधिक महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपातील वाढत्या वादामुळे बंडाळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : महापालिकेच्या अर्थकारणातील सर्वाधिक महत्त्वाचे पद मानले जाणाऱ्या स्थायी समिती सभापतिपदावरून भाजपातील वाढत्या वादामुळे बंडाळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या समितीत मुळातच आमदार बाळासाहेब सानप यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांना झुकते माप दिले गेले असून, त्यातच सभापतिपददेखील याच विभागाला देण्याची चर्चा असून, गणेश गिते प्रबळ दावेदावार आहेत. त्यामुळे सोमवारी (दि.१५) प्रदेश संघटनमंत्री किशोर काळकर यांना अन्य इच्छुकांनी भेटून तीव्र नाराजी व्यक्त करतानाच टोकाचे इशाारे दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतर्गत बंडाची शक्यता लक्षात घेऊन पक्षाने सबुरीने घेण्याचे ठरविले असून, बुधवारी (दि.१७) उमेदवारी दाखल करतानाच ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे वृत्त आहे.विशेष म्हणजे भाजपाच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे या विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी नाशिकमध्ये आल्या असताना यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि.१५) हा प्रकार घडला आहे. महापालिकेत भाजपाचे बहुमत असले तरी या संस्थेवर वर्चस्वासाठी भाजपा आमदारांत सुरुवातीपासूनच स्पर्धा आहे. त्याचप्रमाणे आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील नगरसेवकांना खूश करण्यासाठी धडपड सुरू आहेत. स्थायी समितीवर भाजपाच्या नऊ पैकी चार सदस्य हे पूर्व नाशिक मतदारसंघातील असून, हे सर्वच सभापतिपदाचे दावेदार आहेत. यात गणेश गिते, उद्धव निमसे, कमलेश बोडके आणि प्रा. शरद मोरे यांचा समावेश असला तरी गिते यांची दावेदारी अधिक बळकट मानली जात आहे. त्यामुळे सर्वच पदे आणि प्रतिनिधित्व नाशिक पूर्व मतदारसंघात आणि त्यातही पक्षातील आगंतुकांना द्यायचे काय असा वाद घुमसत आहेत. त्यामुळे मध्य नाशिकमधून आमदार फरांदे समर्थक स्वाती भामरे यांनीही सभापतिपदासाठी दावेदारी केली आहेत. परंतु काहीही झाले तरी गिते यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगितले जात असून, त्यामुळे सोमवारी भाजपाच्या राष्ट्रीय चिटणीस सरोज पांडे व संघटनमंत्री किशोर काळकर यांच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. यावेळी इच्छुकांनी संघटनमंत्री किशोर काळकर याच्याकडे नाराजी व्यक्त केली आहे. काळकर यांनी सर्व इच्छुक म्हणणे ऐकून घेऊन घेतला आहे. सभापतिपदाच्या उमेदवारीबाबत अजून काणत्याही निर्णय झाला नसल्याचे सांगत, नाराजांना शांत करण्याचा प्रयत्न केला.बुधवारीच उमेदवारीचा फैसलास्थायी समिती सभापतिपदासाठी भाजपात सुरू झालेले वाद बघता आता संघटन स्तरावर काळजी घेतली जात असून, उमेदवाराचे नाव बुधवारी (दि.१७) जाहीर करण्यात येणार आहे. सभापतिपदाची निवडणूक गुरुवारी (दि.१८) होणार आहे. त्यासाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यावेळी हा निर्णय घेणार आहे. अगोदर अर्ज दाखल करून ऐनवेळी माघार घेण्याचे ठरविल्यास बंडखोरीला वाव असल्याने बुधवारी एकच अधिकृत उमेदवार घोषित करून त्याचाच अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाBJPभाजपा