पंचवटी : चार ते पाच दिवसांपूर्वी दिंडोरीरोडवरील एका नवनाथ पूर्ण नाव पत्ता माहीत नाही नामक युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली होती या घटनेत जखमी झालेल्या युवकाचा दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिंडोरीरोड भागातील मायको दवाखाना राहणाऱ्या नवनाथ नामक युवकाला संशयित गट्टया संजय जाधव याने काहीतरी अज्ञात कारणावरून मारहाण केली होती त्यात नवनाथच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला त्याची मानलेली बहीण रंजना जाधव हिने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते तेथे उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केल्याचे समजते. मयत नवनाथ व जाधव यांच्यात मारहाण झाली होती मात्र त्यानंतर मयत हा डोक्यावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मयताचा व्हीसेरा तपासणीसाठी धुळे येथिल प्रयोगशाळेत पाठविला जाणार असून त्यात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यावर संशयास्पद आढळल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 13:57 IST
मयताचा व्हीसेरा तपासणीसाठी धुळे येथिल प्रयोगशाळेत पाठविला जाणार असून त्यात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल. प्रयोगशाळा अहवाल प्राप्त झाल्यावर संशयास्पद आढळल्यास पुढील कारवाई केली जाणार आहे.
मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
ठळक मुद्देमानलेली बहीण रंजना जाधव हिने जिल्हा रुग्णालयात दाखल केले पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद