इंदिरानगर : भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री पाथर्डी फाटा ते राणेनगर या समांतर रस्त्यावर घडली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पाथर्डी फाट्यावरील एका बांधकाम साईटवर काम करणारा अनुपकुमार ऊर्फ सोनुलाल प्रसाद पांडे (३०, नयनतारा गोल्ड, पाथर्डी फाटा, मूळ राहणार मनकापूर, जिल्हा बोंडा,उत्तर प्रदेश) हा शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बांधकाम साईटजवळील पाथर्डी फाटा ते राणेनगर हा रस्ता ओलांडत होता़ त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या टेम्पोने (एमएच ०८, एच ६३६२) त्यास जोरदार धडक दिली़ यामध्ये पांडेच्या डोके व हाता-पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले़ या अपघात प्रकरणी अरुण नंदलाल वर्मा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात टेम्पोचालक रघुनाथ विष्णू गायकवाड (द्वारका) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (वार्ताहर)
टेम्पोने दिलेल्या धडकेत मजुराचा मृत्यू
By admin | Updated: November 17, 2014 00:52 IST