शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

घराच्या आगीत  पत्नीचा मृत्यू : पती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 01:12 IST

गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये बांधकामाच्या साइटवरील वॉचमनच्या खोलीस अचानक लागलेल्या आगीत झोपलेल्या दांपत्यापैकी पत्नीचा भाजून मृत्यू, तर पती गंभीर जखमी भाजल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये घडली़

नाशिक : गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये बांधकामाच्या साइटवरील वॉचमनच्या खोलीस अचानक लागलेल्या आगीत झोपलेल्या दांपत्यापैकी पत्नीचा भाजून मृत्यू, तर पती गंभीर जखमी भाजल्याची घटना मंगळवारी (दि़ १२) मध्यरात्रीच्या सुमारास गंगापूर पोलीस ठाणे हद्दीतील ध्रुवनगरमध्ये घडली़ आयेशा खातून समशेर (३५,रा़ धु्रवनगर, गंगापूर, नाशिक, मूळ रा़ बिहार) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून, जखमी समशेर अमरेंद्र शहा (३५) यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़  गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धु्रवनगरमध्ये आदित्य कन्स्ट्रक्शनची बांधकामाची साइट सुरू आहे़ या साइटवरील ठेकेदार पंडित यांनी नुकतेच भिवंडी येथून समेशर अमरेंद्र शहा व त्याची पत्नी आयेशा खातून समशेर यांना वॉचमन म्हणून कामास ठेवले होते़ या दोघांना राहण्यासाठी साइटजवळ पत्र्याची खोली बांधण्यात आली असून,  यामध्ये हे दोघे पती-पत्नी राहत होते़ मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका नागरिकाने फोन करून या खोलीला आग लागल्याची माहिती दिली़ त्यानुसार गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक माळी हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले असता या खोलीतून मोठ्या प्रमाणात धूर येत होता.  उपनिरीक्षक माळी हे सहकाºयांसह मोबाइलच्या बॅटरीच्या साहाय्याने खोलीत गेले असता आयेशा समशेर ही शंभर टक्के जळाल्याने मयत झालेली होती़ तर तिचा पती समशेर हा मदत मागण्यासाठी इतरत्र पळत होता़ पोलिसांचे वाहन पाहिल्यानंतर तो पोलिसांजवळ आला़ या आगीमध्ये तो चाळीस टक्के भाजला असून, त्यास पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ दरम्यान, या खोलीस आग नेमकी कशामुळे लागली? पती-पत्नीचे वाद झाले होते का? याबाबत पोलीस माहिती घेत आहेत़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

टॅग्स :fireआग