शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारानंतर आदिवासी युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 17:15 IST

गुजरात हद्दीतील घटना : संतप्त ग्रामस्थांची पोलिस ठाण्याकडे धाव

ठळक मुद्देया घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कापराडा पोलिस ठाणे गाठून आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत युवतीचे प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला.

वेळुंजे : बोरमाळ देवडोंगरा ता. त्र्यंबकेश्वर येथील गरीब आदिवासी कुटुंबीयातील २२ वर्षीय युवतीला गुजरात राज्यातील दमणगंगा नदीलगत असलेल्या टिटवमाळ जंगलात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची घटना २३ मार्च रोजी घडली होती. दरम्यान, जखमी युवतीवर उपचार सुरु असताना बुधवारी (दि.२७) पहाटे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कापराडा पोलिस ठाणे गाठून आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत युवतीचे प्रेत ताब्यात न घेण्याचा पवित्रा घेतला. अखेर, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर युवतीचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी तिचे नातेवाईक सुरतला रवाना झाले.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दि. २३ मार्च रोजी बोरमाळ देवडोंगरा, ता.त्र्यंबकेश्वर येथील २२ वर्षीय युवतीला रात्रीच्या वेळेस तिच्या गावापासुन पाच किमी अंतरावर असलेल्या गुजरात राज्यातील दमणगंगा नदी लगत टिटवमाळ (उसर) येथे जंगलातील शेतात नेण्यात आले आणि ओढणीने गळा आवळुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचवेळी तिच्या डोक्यात दगड मारु न तिला जिवे मारण्याचा प्रयत्न करत संशयित आरोपीने पळ काढला. सकाळी शेतात गेलेल्या लोकांना सदर युवती रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध आवस्थेत आढळुन आल्यानंतर तिला वलसाड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचाराकरीता सुरत येथे नेण्यात आले असता बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. तत्पूर्वी युवती बेवारस सापडल्याने सोशल मीडीयातुन प्रसिद्धी झाली. सदर युवती बोरमाळ देवडोंगरी येथील असल्याचे समजल्यावर व लगतच्याच गुजरात राज्यातील घोटवळ येथील गणेशभाई काळुभाई नेवाल या मुलानेच हा प्रकार केल्याचे ग्रामस्थांना समजल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली. गुजरात हद्दीलगत सततच्या या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कापराडा पोलिस ठाणे गाठून आरोपीच्या अटकेची मागणी केली.आरोपीस अटकघटनेचे गांभीर्य ओळखुन गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व हरसुल पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव बडे हे कापराडा पोलिस स्टेशन येथे आले. त्यांनी समन्वय बैठक घेऊन आरोपीला ताब्यात घेतले तर यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी हद्दी लगतच्या गावांत सातत्याने पेट्रोलींग केली जाईल असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर सदर युवतीचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्याकरीता सुरतला रवाना झाले. दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात व महाराष्ट्र राज्याच्या दमणगंगा नदीकिनाऱ्या लगतच्या काही गावांत सातत्याने घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे दोन्हीकडील जनतेत दुरावा निर्माण होत असुन भविष्यात कुठलीही वाईट घटना घडुन नये या करिता गुजरात राज्यातील वलसाड जिल्हा पोलीसांना त्र्यंबकेश्वर शिवसेना पदाधिकाऱ्यांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी