नाशिक : आईचा दशक्रिया विधी दक्षिण काशी समजल्या जाणार्या पवित्र गोदावरी नदीतील रामकुंडावर करण्याची मनीषा घेऊन मुंबईहून आलेल्या आजारी वृद्ध मुलाचा दशक्रिया विधीदरम्यान मृत्यू झाला़ मुंबई येथील रहिवासी सुरेश हरिवल्लभदास राय (५९) हे आजारी असतानाही आपल्या आईचा दशक्रिया विधी करण्यासाठी रविवारी पवित्र रामकुंडावर आले होते़ दरम्यान, दशक्रिया विधी सुरू असताना आजारी असलेल्या राय यांची तब्येत बिघडली़ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉ़ पाटील यांनी मयत घोषित केले़ दरम्यान, या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
आईच्या दशक्रिया विधीसाठी आलेल्या मुलाचाही मृत्यू
By admin | Updated: May 5, 2014 15:21 IST