शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

खोपडी येथे विहिरीत पडून मोराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:58 IST

सिन्नर: तालुक्यातील खोपडी बु॥ येथे विहिरीत पडलेल्या मोराला त्वरीत बाहेर न काढल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. वनखात्याला कळवूनही त्यांना मोराला बाहेर काढण्यासाठी पावले न उचलल्याने राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचलो. मात्र, त्यापूर्वीच मोराचा मृत्यू झाल्याचे वनखात्याने म्हटले आहे.

सिन्नर: तालुक्यातील खोपडी बु॥ येथे विहिरीत पडलेल्या मोराला त्वरीत बाहेर न काढल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. वनखात्याला कळवूनही त्यांना मोराला बाहेर काढण्यासाठी पावले न उचलल्याने राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी पोहचलो. मात्र, त्यापूर्वीच मोराचा मृत्यू झाल्याचे वनखात्याने म्हटले आहे.पाण्याच्या शोधात फिरणारा मोर खोपडी बु॥ येथील थोरात मळ्यातील दशरथ कचरु गुरूळे यांच्या शेतातील विहिरीत पडला. विहिरीत थोडेसेच पाणी असल्याने एका बाजूला कोरड्या जागेवर मोर उभा असल्याचे परिसरातील रहिवाशांना दिसला. गणेश घोलप, रंगनाथ गुरूळे यांनी पोलीस पाटील जनार्दन गुरूळे यांना मोर पडल्याची माहिती दिली. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरिक्षक साहेबराव पाटील यांना माहिती दिली. त्यांनी वनखात्याला माहिती देऊन तातडीने मोराला बाहेर काढण्यासाठी माणसे पाठवण्यास सांगितले. मात्र, वनखात्याने त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. रात्रीतून विहिरीला थोडे पाणी वाढल्याने मोर पाण्यातच कसा बसा उभा असल्याचे त्यांना दिसले. पुन्हा पोलीस पाटील व इतरांनी वनखात्याच्या कर्मचाऱ्यांना भ्रमणध्वनी केले. मात्र, त्यांची येण्याची लक्षणे न दिसल्याने परिसरातील एकाने विहिरीत उतरून मोराला बाहेर काढले. रात्रभर पाण्यात उभा राहिल्याने गारठलेला मोर जमिनीवर पायही टेकू शकत नव्हता. त्याला काही वेळ उन्हातही ठेवण्यात आले. मात्र, थंडीने गारठलेल्या मोराचा काही वेळातच मृत्यू झाला. त्यानंतर जवळपास तासाभराने वनखात्याचे थोरात व शिंदे नावाचे कर्मचारी तेथे आले. तुम्ही वेळेवर आले असते तर मोराला दवाखान्यात नेता आले असते व मोराचे प्राण वाचू शकले असते असा आरोप करीत रहीवाशांनी दोघांनाही चांगलेच फैलावर घेतले.परिसरातील एका पशुवैद्यकीय अधिका-यालाही रहिवाशांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून मोरावर उपचारासाठी येण्याची विनंती केली होती. मात्र, हे अधिकारी बाहेरगावी असल्याने ते येऊ शकले नाहीत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हळकुंडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मोराचा दफनविधी करण्यात आला. 

टॅग्स :Nashikनाशिक