शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

मुसळगावच्या विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला मारून विहिरीत फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून, याबाबत दोषींंवर कडक कारवाई करावी, अशी तक्र ार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरू भोर (रा. जानोरी, ता. इगतपुरी) यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे दाखल केली आहे.

ठळक मुद्देघातपाताचा आरोप : वडिलांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कवाडीवºहे : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील विवाहिता माधुरी विकास शिरसाट (२५) हिचा शारीरिक,मानसिक छळ करून तिला मारून विहिरीत फेकल्यामुळे तिचा मृत्यू झाला असून, याबाबत दोषींंवर कडक कारवाई करावी, अशी तक्र ार विवाहितेचे वडील पंढरीनाथ केरू भोर (रा. जानोरी, ता. इगतपुरी) यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे दाखल केली आहे.आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत सासरे नामदेव गंगाधर शिरसाट, पती विकास नामदेव शिरसाट, सासू गयाबाई नामदेव शिरसाट व दीर किरण यांस कडक शासन व्हावे, अशी मागणी पंढरीनाथ भोर यांनी तक्रारीत केली आहे. भोर यांची मुलगी माधुरी हिचा विवाह १२ मार्च २०१८ रोजी मुसळगाव येथील विकास शिरसाट यांच्या सोबत झाला होता. तेव्हापासून सासरचे लोक माधुरीला वडिलांकडून पाइपलाइन व ट्रॅक्टर खरेदीसाठी मोठ्या रकमेची मागणी करत होते. अडचण असूनदेखील भोर यांनी मुलीसाठी सुरुवातीला ४० हजार रुपये रोख दिले. त्यानंतर माधुरीला मुलगा झाला. तरीही माधुरीला त्रास व छळ आणि पैशांचा तगादा सुरूच होता. याबाबत ती वारंवार आईवडिलांकडे कैफियत मांडत होती. मात्र, शुक्र वारी (दि. २८) सायंकाळी पंढरी भोर यांना फोन करून मुलगी माधुरी जानोरीला आली का, ती गायब आहे अशी विचारणा सासरे नामदेव शिरसाठ यांनी केली. माधुरी विहिरीत मृतावस्थेत आढळून आल्याने भोर यांनी सासरच्यांनी तिचा घातपात केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.सात दिवसांपूर्वी माधुरीला वडील पंढरी भोर यांनी सोन्याचे दागिने नेऊन दिले होते. परंतु विहिरीतून माधुरीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा तिच्या अंगावर सर्वच नकली दागिने होते. यामुळे खरे सोन्याचे दागिने कुठे गायब झाले आहेत, असा सवालही भोर यांनी उपस्थित केला आहे.तक्र ारीची सखोल चौकशी केली जाईल. कायदा कुणालाही सोडत नाही. परिस्थितीबाबत माहिती घेऊन कारवाई करू. तक्रारदाराला न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.- डॉ. आरती सिंह,पोलीस अधीक्षक

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे