देवळाली कॅम्प : लहवित रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेगाडीखाली सापडून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बिबट्याला उडविल्याची घटना रेल्वे गॅँगमन जनार्दन लोहरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजन गायकवाड, सहायक वनरक्षक भामरे, वनपाल गोसावी यांच्या पथकाने पाहणी केली. नाशिकमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात उत्तर तपासणी करण्यात आली. दरम्यान, लहवितजवळील बार्न स्कूल परिसरातील रेल्वेमार्गावर बिबट्याचा अपघाती मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. यापूर्वी अनेक गायी-म्हशींचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झालेला आहे. (वार्ताहर)
रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
By admin | Updated: July 26, 2014 00:50 IST