शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:च्या लग्नाच्या पत्रिका वाटायला गेलेल्या वराचा अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 13:26 IST

सटाणा : स्वत:च्या लग्नसमारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या येथील तरूणाचा नाशिक येथे दुचाकी आदळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली.

सटाणा : स्वत:च्या लग्नसमारंभाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या येथील तरूणाचा नाशिक येथे दुचाकी आदळून जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेने सटाणा शहरावर शोककळा पसरली आहे. निलेश बाळासाहेब धिवरे असे या दुर्दैवीतरूणाचे नाव आहे. सटाणा तहसीलमध्ये तलाठी असलेल्या बी डी धिवरे यांचे चिरंजीव निलेश बाळासाहेब धिवरे यांचा विवाह सटाणा तहसीलमधीलच अव्वल कारकून रवींद्र मगर यांच्या कन्येशी २५ डिसेंबर रोजी मराठा हायस्कूल सटाणा येथे होणार होता. विवाहसोहळ्याची संपूर्ण जय्यत तयारी झालेली असतांना नाशिक येथील जवळच्या मित्रपरिवाराला व नातेवाईकांना विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी निलेश काल नाशिक येथे गेला होता.रात्री उशिरा पत्रिका वाटून निलेश मामांकडे मुक्कामाला जात असतांना सिडको परिसरातील अतुल डेअरी परिसरात त्याची दुचाकी दुभाजकाला धडकल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. उपचार मिळण्यापूर्वीच निलेशचा मृत्यू झाला. सटाणा शहरातील भाक्षी रोडलगतच्या शिवाजी नगर येथे राहणाºया धिवरे कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला असून विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असतानाच अशी दुर्दैवी घटना घडल्याने शिवाजी नगरसह भाक्षी रोड शोकसागरात बुडाला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक