शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू

By admin | Updated: July 30, 2016 00:24 IST

पवारवाडी येथील घटना : अपघातानंतर तणाव

 नाशिकरोड : रेल्वे मालधक्का येथून जियाउद्दीन डेपोमार्गे सुभाषरोडला येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास पाठीमागून धडक दिल्याने रमाबाई आंबेडकरनगर येथील युवक धीरज सुधाकर चंद्रमोरे (३०) हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रमाबाई आंबेडकरनगरमध्ये राहणारा किराणा दुकानदार धीरज सुधाकर चंद्रमोरे (वय ३०) हा दुपारी एकच्या सुमारास हिरोहोंडा (एमएच १५ सीयू ७५२१)वरून जियाउद्दीन डेपोमार्गे सुभाषरोडकडे जात होता. पवारवाडी रेल्वे कॉलनी प्रवेशद्वारासमोर पाठीमागून आलेल्या सीमेंटच्या गोण्या घेऊन जाणाऱ्या दहाचाकी ट्रकने (एमएच १५ एजी ५९७३) दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने धीरज हा खाली पडून ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. अपघात इतका भयंकर होता की अपघात बघणारेही सुन्न झाले होते.सुभाषरोड येथून मालधक्का येथे जाणाऱ्या दाट लोकवस्तीतील रस्त्यावरून अवजड वाहनास बंदी असतानादेखील या मार्गावरून सर्रास धोकादायक अवजड वाहतूक सुरूच आहे. याच मार्गावर धीरज यास आपला जीव गमवावा लागला.सदर अपघातानंतर संतप्त नागरिक आक्रमक झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. अपघातानंतर परिसरातील रहिवासी व मयत धीरजचे नातेवाईक घटनास्थळी जमल्याने मोठा जमाव जमला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. मयत धीरज याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)