शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सुरगाण्यातील राहुडे गावात  अतिसाराने दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:12 IST

सुरगाण्यातील राहुडे येथील गावात अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. साथरोग पसरलेल्या या गावांमधील पाण्याचे सर्व स्रोत बंद करण्यात येऊन टॅँकरने शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे.

नाशिक : सुरगाण्यातील राहुडे येथील गावात अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. बुधवारी आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या तीन झाली आहे. साथरोग पसरलेल्या या गावांमधील पाण्याचे सर्व स्रोत बंद करण्यात येऊन टॅँकरने शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे.  पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरीतील दूषित पाणी प्यायल्याने सुरगाणा तालुक्यातील राहुडे आणि कळवण तालुक्यातील वीरशेत येथे अतिसाराचे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या वाढतच असून, राहुडे येथील बशीराम पांडू लिलके (६५) आणि सीताराम जिवा पिठे (६५) या दोघांचा बुधवारी मृत्यू झाला तर दोन दिवसांपूर्वीच नामदेव गांगुर्डे या इसमाचा मृत्यू झाला आहे. कळवणमध्ये अतिसाराची लागण झालेल्यांची संख्या २४ वरून ३७ इतकी झाली आहे. यातील काहींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कळवणमध्ये दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा चांगलीच हादरली आहे.  जिल्हा परिषदेच्या वतीने पावसाळ्यापूर्वीच तालुक्यांमधील पाणीस्रोतांची तपासणी करण्यात येऊन दूषित पाणीपुरवठा करणाºया ग्रामवसेवकांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात आली होती. सुरगाणा आणि कळवण तालुक्यातदेखील पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. विशेष म्हणजे स्वच्छ पाणीपुरवठा करणारा तालुका म्हणून सुरगाण्याला जिल्हा परिषदेने ‘ग्रीनकार्ड’ देऊन गौरविले आहे. असे असतानाही पहिल्याच पावसात पाणीपुरवठा दूषित झाल्याने दीडशेपेक्षा अधिक रुग्णांना अतिसाराची लागण झाली, तर तीन जणांना प्राण गमवावे लागले आहे.  जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या दोन्ही गावात स्वतंत्र कक्ष सुरू केला असून, गावातील प्रत्येकाची तपासणी केली जात आहे. राहुडेमध्ये १५ आरोग्य सेवक आणि चार डॉक्टरांचे पथक गावातील नागरिकांना पाणी स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करतानाच त्यांना पाण्याची स्वच्छता राखण्याबाबतचे मार्गदर्शन करीत आहेत. गावातील विंधन विहिरी तसेच विहीर बंद करण्यात आली असून, गावाला आरओयुक्त पाणी टॅँकरने पुरविले जात आहे.रुग्णांचा मृत्यू अतिसाराने नाहीराहुडे येथे मयत झालेल्या दोघा रुग्णांचा मृत्यू हा अतिसाराने नव्हे तर एकाचा मृत्यू हा फुफ्फुसाच्या आजाराने तर दुसºयाला पक्षघाताचा आजार असल्यामुळे त्याची प्रकृती अगोदरच नाजूक होती. त्यांना जुलाब, उलट्या झाल्याची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे अतिसाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हणता येणार नाही.- डॉ. विजय देकाटे, जिल्हा आरोग्य अधिकारीहलगर्जीपणा करणाºयांवर कारवाईकळवण आणि सुरगाणा येथील गटविकास अधिकाºयांना गावात शुद्ध पाणीपुरवठा व स्वच्छतेबाबत ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकांना सूचना देऊन गावातील साथरोगावर नियंत्रण मिळविण्याचे आदेश दिले आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास संंबंधित अधिकाºयांवर कारवाई नक्की केली जाईल.  -अनिल लांडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदमाहिती दडविण्याचा प्रयत्नजिल्हा आरोग्य अधिकारी विजय देकाटे यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले होते; मात्र दुसºयाच दिवशी दोन रुग्ण दगावल्याने यंत्रणेचा कारभार उघड झाला आहे. असे असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी देकाटे यांनी या तीनही मृत्यूंचा संबंध हा अतिसाराशी नसल्याचा दावा केला आहे. तर अतिसारामुळे अगोदरच आजारी रुग्ण गंभीर होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदHealthआरोग्य