शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीत बुडून दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:24 IST

तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

निफाड/ पिंपळस : तालुक्यातील पिंपळस रामाचे येथील गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी सदर घटना घडली़ सोमवारी पाच तासांच्या अंतराने दोघांचे मृतदेह तपास यंत्रणेच्या हाती लागले. आतेभाऊ व मामेभावाचा एकाचवेळी बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.तालुक्यातील श्रीरामनगर येथील हर्षद ठकाजी गुंजाळ (१५) हा आतेभाऊ श्याम बाळासाहेब सुरवाडे (२४) याच्याकडे पिंपळस रामाचे येथे आतेबहिणीच्या लग्नासाठी आलेला होता. रविवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान हे दोघे पिंपळस येथील स्मशानभूमीच्या मागे गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेले. सायंकाळी उशीर झाला तरी ते घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. शोध सुरु असताना गोदावरी किनारी दोघांचे कपडे आढळून आले. रात्रीउशीरापर्यंत त्यांचा नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता. चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पथकाने दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण रविवारी उशिरापर्यंत ते मिळून न आल्यामुळे रात्री शोधमोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हर्षद गुंजाळ याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. निफाड उपजिल्हा रुग्णालयात गुंजाळ याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. दुपारी श्रीरामनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत हर्षद हा ठकाजी गुंजाळ यांचा एकुलता मुलगा होता. दरम्यान सोमवारी दुपारी ४ वाजेच्या दरम्यान श्याम सुरवाडे याचा मृतदेह शोधण्यात यश आले. निफाड रुग्णालयात सुरवाडे याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.बहिणीच्या लग्नाआधी मृत्यूश्याम हा दोन बहिणींचा एकुलता भाऊ होता. मोठ्या बहिणीचा विवाह झालेला आहे, तर लहान बहिणीचे मंगळवारी (दि. २१) लग्न होणार होते. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. सर्वत्र लग्नाच्या तयारीची लगबग सुरु होती. दुर्दैवाने हळदीच्या दिवशीच भावाचा मृतदेह पाहण्याची वेळ बहिणीवर आली.

टॅग्स :godavariगोदावरीDeathमृत्यू