शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरीतील नगरपंचायतीच्या कर्मचाºयांना महागाई भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:19 IST

नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी दिले.

ठळक मुद्देप्रशासनाचे आश्वासन । कर्मचाऱ्यांनी सोडले आमरण उपोषण

दिंडोरी : नगराध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण सोडले आहे. कर्मचाºयांना दहा टक्के महागाई भत्ता देण्याचे नगरपंचायत प्रशासनाने मान्य केले. एप्रिलनंतर १०० टक्के समायोजनावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांनी दिले.गेल्या तीन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये करण्यात आले. मात्र पूर्वीच्या ग्रामपंचायत सेवेत असलेल्या कर्मचाºयांना अद्यापही नगररचना विभागाने सेवेत कायम न केल्याने त्यांची वाताहत झाली आहे. अनेक वर्षे काम करत आलेल्या अशा सर्व कर्मचाºयांना किमान वेतन व १०० टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सर्व कर्मचारी संघटनांनी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते. तथापि, लोकप्रतिनिधिनी प्रशासनाने वेतनावर १० टक्के वाढ देण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिंडोरी नगरपंचायत कर्मचाºयांनी उपोषण मागे घेतले. सीटू संघटना प्रणित दिंडोरी नगरपंचायत कर्मचारी संघटनेने शासकीय समावेशन होईपर्यंत शासकीय किमान वेतन फरकासह न मिळाल्याने प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. नगरपंचायतीतसुद्धा जुनेच वेतन दिले जात आहे. प्रांत डॉ. संदीप आहेर, कैलास मवाळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांत राजे, मुख्य अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मध्यस्थीने मागण्यांवर चर्चा झाली. यावेळी नगराध्यक्ष रचना जाधव यांच्या हस्ते कर्मचाºयांना लिंबूपाणी देऊन उपोषण मागे घेण्यात आले.यावेळी सुधाकर चारोस्कर, दिपक सोळंकी, गोटीराम मेधणे, निर्मला सोळंकी, विजय केदारे, कैलास गांगुर्डे, चिंतामण वाघ, भारत कापसे, रामदास चारोस्कर, रंजना निकम, कमल वाघमारे, माधुरी निकम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंप