शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लाडची जि.प. शाळेची शेवगा रोपवाटिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:44 IST

कुपोषणमुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने शेवगा रोपवाटिका तयार केली असून, या रोपवाटिकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

नाशिक : कुपोषणमुक्तीसाठी लाभदायक ठरणाऱ्या शेवगा शेंगाच्या वापरासाठी नाशिक तालुक्यातील लाडची जिल्हा परिषद शाळेने शेवगा रोपवाटिका तयार केली असून, या रोपवाटिकेतून मागणी करणाºया शेतकरी आणि शाळांना शेवग्याची रोपे पुरविण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमध्ये मागील वर्षी शेवगा लागवडीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी चळवळ सुरू केली होती. यापासूनच प्रेरणा घेत नाशिक तालुक्यातील लाडची येथील प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी शेवगा रोपवाटिका तयार केली आहे.कुपोषणाच्या निर्मूलनासाठी मागील वर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम विकास केंद्र सुरू केले होते. तसेच तालुका आढावा बैठकांमध्ये शेवगा लागवडीविषयी माहिती देऊन ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शेवगा लागवड करण्यासाठी आवाहन केले होते. या उपक्र माची दखल घेत अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेला शेवगा बियाणे उपलबध करून दिले होते. नाशिक तालुक्यातील लाडची शाळेतील विज्ञान शिक्षक विवेक खैरनार यांनी विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करून शेवगा रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मुख्याध्यापक विजयकुमार मोरे यांनीही या उपक्र माचे कौतुक करून त्यामध्ये सहभाग घेतला.पंचवटी येथील पांजरापोळ येथून तसेच घरांमधील फेकण्यात येणाºया दुधाच्या रिकाम्या पिशव्या संकलित करण्यात आल्या. फेब्रुवारी महिन्यात सहावीच्या विद्यार्थ्यांनी रोपवाटिकेसाठी आच्छादन व शाळेतील भंगार साहित्य वापरून कुंपण तयार केले. नाशिक येथील महेंद्र पटेल, अंगणवाडीसेविका तसेच शेतकरी यांनी शाळेकडे रोपांची मागणी नोंदविली आहे. ग्रामपंचायतीनेदेखील यामध्ये सहभागी होऊन रोपवाटिकेसाठी पाणी उपलबध करून दिले आहे. लाडची येथील या अभिनव उपक्र माचे सर्वत्र कौतुक होत होत आहे.शालेय वेळेनंतर रोपवाटिकेची निगाशाळेतील शिक्षक कोंडाजी मोरे यांनी शेवगा बियाणे उपलब्ध करून दिले. शालेय वेळेनंतर रोपवाटिकेची निगा राखणे, पाणी देणे, रोपवाटिकेचे संरक्षण करणे ही कामे करण्यात आली. सुरु वातीला केवळ शेवग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या रोपवाटिकेत सध्या शेवग्याची ७०, विलायत चिंच, करंज, चिंच आदी झाडांची ३५० रोपे वाढत आहेत. शाळेच्या या उपक्र माची दखल घेत गावकरी तसेच अंगणवाडी सेविका धनश्री पारधी, मदतनीस हौसाबाई फसाळे यादेखील शालेय वेळेनंतर रोपांचे संरक्षण करण्यासाठी योगदान देत आहेत.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाNashikनाशिक