शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

नांदूरमधमेश्वर अभयारण्यात मृत मासे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 23:29 IST

जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी नदीमध्ये सोमवारी (दि.२०) करंजगाव ते मांजरगावदरम्यान असंख्य मृत मासे आढळल्याने अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सदरच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.

ठळक मुद्देदूषित पाणी : गोदावरीच्या आवर्तनामुळे धोका

लासलगाव/निफाड : जागतिक दर्जाचे पाणथळ क्षेत्र असणाऱ्या नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी नदीमध्ये सोमवारी (दि.२०) करंजगाव ते मांजरगावदरम्यान असंख्य मृत मासे आढळल्याने अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सदरच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी पक्षिमित्रांनी केली आहे.सध्या गंगापूर धरणातून अहमदनगरसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोदावरी प्रवाहित झाली असून, नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणावर काळेक्षार पाणी आणि पाणवेलीही वाहून आल्या आहेत. याच धरणस्थळावर अनेक गावांचाव तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असताना आलेल्या दूषित पाण्यामुळे गोदाकाठवरच्या करंजगाव, कोठुरे, मांजरगाव परिसरात सोमवारी सकाळी नागरिकांना शेकडो मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. याच माशांवर नांदूरमधमेश्वर धरणातील माशांची गुजराण असल्यामुळे आता पक्ष्यांच्या अधिवासावरही त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी डॉ. उत्तमराव डेर्ले यांच्यासह पक्षिमित्रांनी केली आहे.दरम्यान, निसर्ग मित्रमंडळाचे अध्यक्ष डॉ. उत्तम डेर्ले यांनी सांगितले, हा परिसर रामसर परिसर म्हणून घोषित झाला आहे. परिसरात मोठ्या संख्येने देश-विदेशातील पक्ष्यांचा अधिवास आहे. परिणामी धरणाच्या पाण्यातील मत्यसंपदा या दूषित पाण्यामुळे धोक्यात आली आहे.सदरची घटना लक्षात येताच नांदूरमध्यमेश्वर वन्य जीव विभागाचे कर्मचारी तातडीने गोदावरी नदी किनारी पाहणी करण्यासाठी गेले होते त्यांनाही मासे मृत झाल्याचे दिसून आले. दरम्यान मासे मृत झाल्यामुळे प्रदूषण विभागाकडे गोदावरी पात्रातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी असल्याचे नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :fishermanमच्छीमारDeathमृत्यू