शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

चेंबरमध्ये गुदमरून मृत्यू : मदतीसाठी धावला; पण दुर्दैवाने प्राणाला मुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 17:45 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील भुयारी गटारीच्या चेंबरच्या स्वच्छतेचे काम एका खासगी ठेकेदाराकडूून रविवारी (दि.३) सुरू करण्यात ...

ठळक मुद्देसोयीसुविधा सफाई कामगारांना पुरविण्यात आलेली नव्हती. सफाई कामगाराला बाहेर काढण्यास मदत केली

नाशिक : जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील भुयारी गटारीच्या चेंबरच्या स्वच्छतेचे काम एका खासगी ठेकेदाराकडूून रविवारी (दि.३) सुरू करण्यात आले. यावेळी दुपारी बारा वाजेच्या सुमारास येथील एका चेंबरमध्ये एक सफाई कामगार उतरला; दरम्यान त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच दुसरा साथीदार चेंबरमध्ये उतरला; मात्र विषारी वायूमुळे त्याचाही श्वास गुदमरला आणि दोघे अडकले; दरम्यान, अग्निशामक दलाला घटनेची माहिती कळविण्यात आली. जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून एकास जीवंत बाहेर काढले; मात्र मदतीसाठी धावलेल्या अशोक रामपसे (४५, अवधुतवाडी, पंचवटी) या कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला.

पोलिसांच्या माहितीनुसार, शिवाजी स्टेडिअममध्ये यशवंत व्यायामशाळेच्या संरक्षण भिंतीलगत चेंबर आहे. सदरील चेंबरच्या साफसफाईसाठी पप्पू सकट या ठेकेदारास त्याची सफाई कामे करणारी चार-पाच सफाई कामगार आले होते. सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक सफाई कामगार चेंबरचा ढापा काढून आत उतरला असता, आतील विषारी वायुमुळे त्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यास बाहेर काढण्यासाठी अशोक रामपसे यास आत उतविण्यात आले. त्याने आधी उतरलेल्या सफाई कामगाराला बाहेर काढण्यास मदत केली. परंतु, तोपर्यंत अशोक रामपसे  त्याचा चेंबरमध्ये विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यु झाला. तातडीने त्यास रु ग्णवाहिकेतून जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलिसात नोंद करण्यात आली आहे.दरम्यान, याप्रकरणी ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकाराची सोयीसुविधा सफाई कामगारांना पुरविण्यात आलेली नव्हती. तर, जिल्हा क्र ीडा अधिकारी कार्यालयाने सदरचे काम करण्यास ठेकेदार पप्पू सकट यास सांगितले होते. तर, आता जिल्हा क्रडा कार्यालयाने कानावर हात ठेवले आहे. सदरच्या घटनेनंतर मृत अशोक रामपसे याच्या नातलगांनी जिल्हा रु ग्णालयात गर्दी केली होती.

टॅग्स :Nashik Fire Brigadeनाशिक अग्निशामक दलAccidentअपघात